*महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कृषी शास्त्रज्ञांनी राहुरी तालुक्यातील काळे आकडा येथे डाळिंब पीक रोग संकेत पातळीच्या वर गेलेल्या बागेला दिल्या भेटी*
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील वनस्पती रोगशास्त्र व अणुजीवशास्त्र विभाग राबविण्यात येणार्या हॉर्टसॅप प्रकल्पामार्फत जि. अहमदनगर येथील राहुरी तालुक्यातील काळे आखाडा येथे डाळिंब पिक रोग संकेत पातळीच्या वर गेलेल्या बागेला विद्यापीठातील शास्त्रज्ञ यांनी भेटी दिल्या.

चमूमध्ये डॉ. प्रकाश मोरे (कनिष्ठ रोगशास्त्रज्ञ, अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळपीक योजना), डॉ. प्रवीण खैरे (संशोधन सहयोगी, हॉर्टसॅप प्रकल्प रोगशास्त्र व कृषी अनुजीवशास्त्र विभाग), तसेच कृषी विभागाचे श्री बापुसाहेब शिंदे, (तालुका कृषी अधिकारी), श्री. अशोक गिरगुणे (मंडळ कृषी अधिकारी), श्री. म्हस्के सर (कृषी सहाय्यक) हे उपस्थित होते. या भेटी दरम्यान शास्त्रज्ञ शेतकर्यांच्या प्रत्यक्ष शेतावर जाऊन डाळींब उत्पादक शेतकरी यांच्यामध्ये सविस्तर चर्चा केली आणि चर्चेदरम्यान शेतकर्यांच्या शंकांचे निरसन करुन डाळिंब पिकावरील कीड व रोग व्यवस्थापन आणि अधिक उत्पादनासाठी सविस्तर मार्गदर्शन व घडी पुस्तिकांचे वाटप केले. पाहणी केल्यानंतर या बागेमध्ये बुरशीजन्य ठिपके या रोगाचा प्रादुर्भाव दिसला. त्या अनुषंगाने किड एकात्मिक नियंत्रणासाठी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी शेतकर्यांना सखोल असे मार्गदर्शन केले. आर्थिक नुकसान पातळीच्यावर गेलेल्या गावांसाठी हॉर्टसॅप प्रकल्पांतर्गत वेळोवेळी एन. पी. एस. एस., न्यु दिल्ली या संकेतस्थळावर विद्यापीठामार्फत सदर पिकासाठी पीकसरंक्षण सल्ला दिला जातो. सदर प्रक्षेत्र भेटीसाठी या भेटीसाठी डॉ. रवींद्र गायकवाड (विभाग प्रमुख) डॉ. संजय कोळसे (सहयोगी प्राध्यापक) वनस्पती रोगशास्त्र व अनुजीवशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांचे मार्गदर्शन लाभले.








