महात्मा फुले कृषी विद्यापीठात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंचप्रण शपथ कार्यक्रम संपन्न .

महात्मा फुले कृषी विद्यापीठात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंचप्रण शपथ कार्यक्रम संपन्न .

*महात्मा फुले कृषि विद्यापीठात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त पंचप्रण शपथ कार्यक्रम संपन्न*

*राहुरी विद्यापीठ, दि. 9 ऑगस्ट, 2023*

            स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमाचा सांगता सोहळा दि. 9 ऑगस्ट, 2023 पासून सुरु होत आहे. या सांगता सोहळ्याच्या निमित्ताने राज्यभरात मेरी माटी मेरा देश हा उपक्रम केंद्र शासनाच्या सुचनेनुसार साजरा करण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील मध्यवर्ती परिसरातील प्रशासकीय इमारतीसमोर पंचप्रण शपथ कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी.एस. पाटील, कुलसचिव डॉ. विठ्ठल शिर्के, नियंत्रक श्री. विजय पाटील व सहाय्यक कुलसचिव (काव्य) श्री. सागर पेंडभाजे उपस्थित होते. यावेळी सुरक्षा अधिकारी श्री. गोरक्षनाथ शेटे यांनी उपस्थितांना पंचप्रण शपथ दिली. याप्रसंगी विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.