नेवासा मार्केट कमिटीच्या नूतन संचालकांचा बालाजी देडगाव येथे नागरी सन्मान.

नेवासा मार्केट कमिटीच्या नूतन संचालकांचा बालाजी देडगाव येथे नागरी सन्मान.

बालाजी देडगाव (प्रतिनिधी युनूस

पठाण)नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या नेवासा मार्केट कमिटीच्या निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी झालेले नूतन संचालक डॉ. अमृत काळे व बाळासाहेब दहातोंडे यांचा नागरी सन्मान करण्यात आला.

        या कार्यक्रम प्रसंगी मुळा एज्युकेशन संस्थेचे सदस्य बाजीराव पाटील मुंगसे( अण्णा) हे अध्यक्षस्थानी होते. तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक चाइल्ड करिअर इंग्लिश स्कूलचे संस्थापक तथा देडगाव सोसायटीचे संचालक सागर बनसोडे सर यांनी केले. यावेळी बळीराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मच्छिंद्र मुंगसे, युवा नेते हरिभाऊ तागड , विद्यमान सरपंच चंद्रकांत पाटील मुंगसे , नूतन संचालक बाळासाहेब दहातोंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

           यावेळी नूतन संचालक डॉ.अमृत काळे, संचालक बाळासाहेब दहातोंडे व प्रमूख मान्यवर म्हणून नामदेव पाटील शेळके , प्रगतशील बागातदार ऋषिकेश काळे, कौठा गावाचे मा. सरपंच रावसाहेब काळे पाटील यांचा सन्मान करण्यात आला.

           यावेळी सत्कारास उत्तर देत डॉ. अमृत काळे यांनी नेवासा तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती माजी मंत्री, आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक पार पडली व आम्ही उमेदवार म्हणून आम्हाला मतदारांनी भरघोस मतांनी विजयी केलं. व गडाखांचा गड राखला. आम्ही निश्चितच मतदाराचे ऋणी राहू व नव्या जोमाने काम करून मार्केट कमिटीचे नावलौकिक वाढवण्याचे काम करू व जनतेने टाकलेला विश्वास नक्कीच सार्थकी लावू अशा शब्दात आपलं मनोगत व्यक्त केले.

          यावेळी बालाजी देवस्थानचे माअध्यक्ष कुंडलिक दादा कदम, मा.प्राचार्य भाऊराव मुंगसे सर ,माजी चेअरमन भानदास पाटील मुंगसे, माजी चेअरमन बन्सी भाऊ कुटे ,पंचायत समिती सदस्य दादासाहेब एडके,बालाजी पाणी वाटप संस्थेचे चेअरमन संतोष तांबे ,देडगाव सोसायटीचे विद्यमान चेअरमन महेश कदम, सोसायटीचे संचालक संजय पाटील मुंगसे, संदीप कुटे, बालाजी कृषी सेवा केंद्राचे मालक योगेश चेडे ,महेश चेडे ,अमित चेडे, वसंत मुंगसे, दत्ता पाटील मुंगसे, संजय मुंगसे,पतंजली दूध डेरीचे चेअरमन हरिभाऊ कदम ,किशोर वांढेकर, गणेश मुंगसे सर, अमोल तांबे, रामनाथ मुंगसे, योगेश खैरे, गणेश तांबे आदी मान्यवर व विविध संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

        या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार युनूस पठाण यांनी केले तर आभार जेष्ठ पत्रकार बन्सी भाऊ एडके यांनी मानले.