सौंदळा गावचे सरपंच शरदराव आरगडे ग्रामरत्न पुरस्काराने सन्मानित.
सरपंच शरदराव आरगडे "ग्रामरत्न" पुरस्काराने सन्मानीत
नेवासा तालुक्यातील सौंदाळा गावातील राबविलेल्या अभिनव उपक्रमाची दखल घेऊन अखिल भारतीय सरपंच परिषदेने सरपंच शरदराव आरगडे यांना राज्यस्तरीय "ग्रामरत्न" पुरस्कार देऊन सन्मानीत केले आहे
सौंदाळा ग्रामपंचायतने शिवी बंदीचा ठराव घेऊन महाराष्ट्रात महिला सन्मानाचा आदर्श निर्माण केला आहे
हुंडा देणारा व घेणारा कळवा आणि ५००० रू मिळवा
गावातील प्रत्येक मुलीच्या विवाहसाठी ५००० रू अर्थसाहाय्य
विधवा महिलांना पुनर्विवाहची परवानगी देऊन ११००० रू अर्थसाहाय्य
दिपावली निमित्त संपुर्ण गावाला मानसी २ कि मोफत साखर वाटप
ऑनलाईन जुगार बंदी
शालेय विद्यार्थ्यांना संध्याकाळी ७ ते ९ मोबाईल बंदी
यासारखे ठराव घेऊन अमलबजावणी केल्याने "ग्रामरत्न" पुरस्कारासाठी सरपंच शरदराव आरगडे यांची निवड झाल्याची अखिल भारतीय सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे
इतिहासकार श्रीमंत कोकाटे यांच्या अध्यक्षते खाली पार पडलेला
सदरचा कार्यक्रम लोणावळा येथे सेरेणरी रिसॉर्ट येथे २ दिवसाचे विविध विषयांच्या तज्ञाचे मार्गदर्शन ठेऊन त्यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले
राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याने नेवासा तालुक्यातील नागरिकांनी आरगडे यांचे अभिनंदन केले आहे








