पोलीस निरीक्षकावर ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून तात्काळ निलंबणाची कारवाई करावी. मातंग समाजाची मागणी.

पोलीस निरीक्षकावर ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून तात्काळ निलंबणाची कारवाई करावी. मातंग समाजाची मागणी.

सविस्तर - २ नोव्हेंबर २०२४ रोजी, दिवाळी_पाडव्याच्या दिवशी, अहील्यांनगर जिल्ह्यातील, श्रीगोंदा ( ससाणेनगर ) येथे मातंग समाजातील व्यक्तीवर विशिष्ट समूहाने केलेल्या हल्ल्यात, रामदास ससाणे या व्यक्तीचा मृत्यू झाला होता, या गंभीर गुन्ह्याच्या प्रकरणात प्रशासनाने जाणीव पूर्वक गुन्हा दाखल करण्यास विलंब करून, आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप पिडीत व्यक्तींच्या वतीने करण्यात आला होता.

          आमदार नितेश राणे यांनी देखील, ५ फेब्रुवारी २०२५ रोजी श्रीगोंदा येथे पिडीत कुटुंबाची भेट घेऊन आम्ही सर्व तुमच्या सोबत असून सर्वोपरी मदत करणार असल्याचे सागितले होते.

          त्याच अनुषंगाने, पुणे शहर पुणे जिल्हा मातंग समाजाच्या वतीने तसेच श्रीगोंदा येथील सामाजिक कार्यकर्ते अविनाश भाऊ घोडके व ससाणेनगर मातंग समाजातील पीडितांनी, महाराष्ट्र राज्य जाती जमाती आयोग  उपाध्यक्ष श्री.ऍड धर्मपाल मेश्राम यांची  बारामती येथे भेट घेतली, व श्रीगोंदा मधील दगडफेक घटनेतील आरोपिंवर तसेच जाणीवपूर्वक गुन्हा दाखल करण्यास विलंब करणाऱ्या पोलिस निरीक्षक यांच्यावर
ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली.

          यावेळी महाराष्ट्र राज्य जाती जमाती आयोग  उपाध्यक्ष श्री.ऍड धर्मपाल मेश्राम यांनी तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन पुणे शहर पुणे जिल्हा मातंग समाजाच्या प्रतिनिधींना दिले.