नेवासा तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक कडूभाऊ मोहन तांबे यांना मातृशोक.

नेवासा तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक कडूभाऊ मोहन तांबे यांना मातृशोक.

नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील खरेदी विक्री संघाचे संचालक तथा ज्येष्ठ समाजसेवक कडुभाऊ मोहन तांबे, ह.भ.प. नवनाथ महाराज तांबे, शिवाजी महाराज तांबे व दोन मुली यांना नुकतेच कै. विठाबाई जाण्यानं मातृशोक झाला.

      कै. मोहन तांबे व कै.विठाबाई मोहन तांबे यांचा खूप गरिबीचा प्रपंच 75 वर्षांपूर्वी त्यांनी अतिशय जिद्दीने प्रपंच थाटला. अगदी उत्साहानं, कष्टानं प्रपंच मोठा होत गेला. प्रपंचाचा गाडा ओढत असताना त्यांच्या घरात आनंदाचं वातावरण झालं .4 मुले व 2 मुली घरात जन्माला आल्याने त्यांचा रूपाने घर गजबजून गेलं जणू त्यांच्या घरात धार्मिक, विचाराची रत्न जन्माला आली.

    जुन्या पिढीतील असणार हे कुटुंब परंतु नवीन विचारांची धारणा येथील सर्व वैचारिक मंथन करणार हे कुटुंब अगदी आनंद वातावरण जगू लागल .त्यांनी दिलेले मुलाला संस्कार या संस्काराने मुलही अगदी उच्च संस्कारित झाली. मुलींचे लग्न थाटण्यात आली ,मुलांची लग्न ही व्यवस्थित पार पाडली.

    हे कुटुंब शैक्षणिक, राजकीय सामाजिक सर्व क्षेत्रात अगदी अग्रेसर असणारे कुटुंब. शिक्षण क्षेत्रात जास्त भर दिला म्हणून इजिनियर व शिक्षक च्या रूपाने घरात शैक्षणिक वातावरण निर्माण झालं.

      कै. मोहन तांबे व कै. विठाबाई तांबे सामाजिक बांधिलकी असणारे कुटुंब . स्वतः साठी जगता जगता दुसऱ्यासाठी जगून पहावं या उक्तीन चालणार वैचारिक कुटुंब .अतिशय प्रपंच थाटामाटात चालत असताना काही दिवसांपूर्वी याच कुटुंबातील प्रमुख व्यक्ती कै. मोहन तांबे यांच्यावर काळाने घाला घातला .तरीही पती जाण्याने खचून न जाता मुलांना प्रापचिक गोष्टीचे ज्ञान देउन पुन्हा प्रपचात आनंदी वातावरण निर्माण केले.

     कै. विठाबाई यांच्या जीवनात सुख समाधानाचे वातावरण असताना भगवंत बालाजी ने त्यांना उदंड आयुष्य हि दीले . आनंदाचे आयुष्य जगत असताना त्यांचे रहात्या घरी वृद्धापकाळाने 94 व्यां वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी ही 4 थी पिढी पाहिली.त्यांच्या जाण्याने तांबे कुटूंबातील पुरोगामी विचारांचा व धार्मिक वृत्तीचा आधरवड हरपला. त्यांच्या जाण्याने तांबे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. तसेच त्यांचा जाण्याने देडगाव व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

         त्यांच्या पश्चात मुले, मुली, जावई, सुना, नातवंडे परतुंडे व मोठा तांबे परिवार व गणगोत्र गोतळा आहे.