कोपरगाव तालुक्यातील नागरिकांच्या विविध शासकीय कार्यालयांतील समस्या सोडवण्यासाठी तहसील कार्यालय कोपरगाव येथे आयोजित 'जनता दरबार' आज आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
कोपरगाव ( प्रतिनिधी):- तहसील कार्यालय कोपरगाव येथे आलेल्या नागरिकांच्या समस्या समजावून घेऊन त्या तातडीने सोडवण्याच्या सुचना यावेळी आशुतोषदादांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच नागरिकांची कामे वेळेवर करा, कामात दिरंगाई केल्यास व नागरिकांना त्रास झाल्यास गय केली जाणार नाही अशी तंबी उपस्थित अधिकाऱ्यांना दिली.
यावेळी तहसीलदार महेशजी सावंत, गटविकास अधिकारी संदीपजी दळवी, मुख्याधिकारी सुहासजी जगताप, वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता अजयजी धांडे, उपकार्यकारी अभियंता डी.डी. पाटील, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे विनोदजी मेणे, कोपरगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक संदीपजी कोळी, कोपरगाव शहरचे पोलीस निरीक्षक भगवानजी मथुरे, गोदावरी डावा तट कालव्याचे उपविभागीय अभियंता श्री पाटील, गोदावरी कालवे जलनि:सारण विभागाचे किरणजी तुपे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपअभियंता अशोकजी लोहरे, तालुका कृषी अधिकारी मनोजजी सोनवणे, नायब तहसीलदार हेमंतजी पाटील, श्री कंटारे, पंचायत समिती कृषी अधिकारी सचिनजी कोष्टी, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. ए.एस. तांबे, पशुधन विकास अधिकारी डॉ. श्रद्धाताई काटे, बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती रुपालीताई धुमाळ, पंचायत समिती विस्तार अधिकारी श्री साबळे, बांधकाम विभाग उपअभियंता सी.डी. लाटे, ए.व्ही. लहारे, के.बी. तुपे, एस.आर. दळवी, कनिष्ठ अभियंता अंजलीताई वाघ, मंडळ कृषी अधिकारी एस.के. मलिक, मंडळ अधिकारी भाऊसाहेबजी कोळगे, सामाजिक वनीकरणचे वनपरिक्षेत्र अधिकारी एन.जे. रोडे, वनविभाग वनपरिक्षेत्र अधिकारी वाय.जे. पाचरणे, उपविभागीय जलसंधारण अधिकारी पी.एस. खेमनर, पशुधन पर्यवेक्षक अंजलीताई येळवंडे, आदींसह कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी जिल्हा परिषद - पंचायत समिती सदस्य, माजी नगरसेवक, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.