निष्क्रिय गट विकास अधिकाऱ्यामुळे नेवासा तालुक्यात शिक्षण ,आरोग्य व कृषी क्षेत्राचे तीन तेरा आणि नऊ बार .

निष्क्रिय गट विकास अधिकाऱ्यामुळे नेवासा तालुक्यात शिक्षण ,आरोग्य व कृषी क्षेत्राचे तीन तेरा आणि नऊ बार .

अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी// संभाजी शिंदे

       निष्क्रिय गटविकास अधिकाऱ्यामुळे शिक्षण ,आरोग्य व कृषी क्षेत्राचे तीन तेरा  आणि नऊ बारा वाजले आहेत .

      प्रसार माध्यमाच्या माध्यमातून अनेक वेळा कान उघडणी करूनही संबंधित गटविकास अधिकाऱ्यावर त्याचा किंचितही परिणाम होताना दिसून येत नाही .

      प्राथमिक शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या अनेक भौतिक सुविधांबाबत समस्या निर्माण होत असतानाही त्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करण्यात येत आहे .

      आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा , आरोग्य केंद्रांची दयनीय अवस्था यामुळे नेवासा तालुका नेहमीच चर्चेत येत आहे .

      त्याचबरोबर कृषी क्षेत्रात कायमस्वरूपी कृत्रिम पद्धतीने रासायनिक खतांचा तुटवडा बियाण्यांचा तुटवडा व वाढीव दराने विक्री हे जणू मोठे रॅकेटच तयार झाले असल्याचे चित्र दिसून येत आहे .यावर मात्र गटविकास अधिकाऱ्याचे लक्ष दिसून येत नाही.

        सदर गोष्टीचा विचार करून संबंधित गटविकास अधिकाऱ्याची चौकशी करण्यात यावी व तालुक्यातील विविध नागरी समस्या लवकरात लवकर सोडवण्यात यावे अशी मागणी आता तालुक्यातील जनतेकडून होत आहे .