बहुजन महिला ग्रामीण विकास संघ व प्रेरणा प्रतिष्ठाण संचलित सहारा नर्सिंग इन्स्टिट्युट मार्फत श्री संत गाडगे महाराज आश्रम शाळेतील माध्यमिक. उच्च माध्यमिक वर्गाला शैक्षणीक जागरूकता कायदेविषयक शिबीर .
श्री संत गाडगे महाराज आश्रम शाळा राहुरी या ठिकाणी प्रेरणा प्रतिष्ठान संचलित सहारा नर्सिंग इन्स्टिट्यूट तसेच बहुजन महिला ग्रामीण विकास संघ यांच्या वतीने शाळेतील माध्यमिक उच्च माध्यमिक वर्गातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांना सहारा नर्सिंग इन्स्टिट्यूट मार्फत सुरू होणारे ANM,OT डिप्लोमा कोर्स ,बेसिक ऍडव्हान्स ब्युटिशन कोर्स, बालवाडी अंगणवाडी कोर्स, फोटोग्राफी प्रोफेशनल अँड ऍडव्हान्स कोर्स अत्यंत अल्प फी मध्ये सुरू होत असून सर्व कोर्से महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त असून दहावी बारावी पास नापास मुलं मुलींसाठी करिअरच्या उत्तम संधी सहारा नर्सिंग इन्स्टिट्यूट मार्फत दिल्या जात आहेत असे सहारा नर्सिंग इन्स्टिट्यूट चे उपाध्यक्ष जयश्री साळवे मॅडम यांनी सांगितले व विद्यार्थ्यांना करिअरचे मार्गदर्शन दिले तसेच बहुजन महिला ग्रामीण विकास संघाच्या उपाध्यक्ष अँड .मनिषा लाला पंडीत यांनी शाळेतील विद्यार्थिनी विद्यार्थी यांना उत्तम भविष्याच्या सुवर्णसंधी सहारा इन्स्टिट्यूट मार्फत देण्यात येत आहेत असे प्रतिपादन केले तसेच बहुजन महिला ग्रामीण विकास संघामार्फत कायदेविषयक मोफत सल्ला व मार्गदर्शन दिले जात आहे असे सांगितले कार्यक्रमाच्या शेवटी सहारा नर्सिंग इन्स्टिट्यूटच्या अध्यक्षा तेरेसा साळवे मॅडम यांनी शाळेचे मुख्याध्यापक गजानन खर्चे सर व उपमुख्याध्यापक सर तसेच शाळेच्या सौ भारती खिलारी मॅडम तसेच लाड मॅडम किरण पवार सर तसेच सर्व शिक्षक व इतर शिक्षक वृंदावन वर्ग या सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले सदरच्या कार्यक्रमाला विशेष सहकार्य सहारा नर्सिंग इन्स्टिट्यूटच्या खजिनदार निहारिका चौधरी मॅडम तसेच बहुजन महिला ग्रामीण विकास संघाचे अध्यक्ष विनोद कुमार लाला पंडित यांचे लाभले .