अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीस दहा वर्षे सक्त मजुरी व दंडाची शिक्षा.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीस दहा वर्षे सक्त मजुरी व दंडाची शिक्षा.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीस दहा वर्षे सक्त मजुरी व दंड अहमदनगर : आरोपी नामे गणेश शहाजी परकाळे , वय -३० वर्षे , रा . पिंप्री घुमरी ता . आष्टी जि . अहमदनगर , याने पिडीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी अहमदनगर येथील मे . विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती माधुरी एच . मोरे यांनी लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण करणारा कायदा २०१२ चे कलम ६ तसेच भा.द.वि.कलम ३७६ ( २ ) ( एन ) नुसार दोषी धरून आरोपीस दहा वर्षे सक्त मजुरीची शिक्षा तसेच रक्कम रुपये ५,००० / - हजार रूपये व दंड न भरल्यास १ महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली . सदर खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील अॅड . मनिषा पी . केळगंद्रे - शिंदे यांनी पाहिले . घटनेची थोडक्यात हकीगत की , दिनांक १३.०३.२०१ ९ रोजी फिर्यादी यांची पिडीत मुलगी वय १६ वर्षे हीस कोणीतरी अज्ञात इसमाने घरातून पळून नेलेबाबतची फिर्याद भिंगार कॅम्प पोलिस स्टेशनला फिर्यादी यांनी दिली होती . त्यानुसार भिंगार पोलिस स्टेशनला भा.द.वि. कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल केला . पिडीत मुलगी ही दिनांक ०५.० ९ .२०१ ९ रोजी भिंगार कॅम्प पोलिसांना आरोपी गणेश शहाजी परकाळे याचे सोबत गोल्हेगाव ता . शिरूर जि . पुणे येथे मिळून आली . पोलिस स्टेशनला आरोपी व पिडीत मुलगी यांना घेवून आल्यानंतर पिडीत मुलीने सांगितले की , तिची आरोपी याचे सोबत मामाच्या गावाला ओळख झाली होती . तसेच आरोपी याचे लग्न झाले असुन त्याला दोन मुले व एक मुलगी असल्याचे सांगितले . तसेच दिनांक १५.०८.२०१८ रोजी आरोपी याने पिडीत मुलीला धमकी दिली की , तु जर माझ्या सोबत आली नाही तर मी तुझ्या आई वडिलांना मारून टाकेल . त्यानंतर दिनांक १४.०३.२०१ ९ रोजी आरोपी याने पिडीत मुलीला फोन करून स्टेट बँक चौक , अहमदनगर येथे धमकी देवून बोलविले . त्यानंतर आरोपी हा पिडीत मुलीला घेवून सुरुवातीला बेलवंडी फाटा येथे घेवून गेला . तेथे एक खोली भाडयाने घेवून सुमारे पाच महिने ठेवले . त्या ठिकाणी आरोपीने पिडीत मुलीची इच्छा नसताना तिचेशी बळजबरीने शारिरीक संबंध केले . दरम्यान आरोपी याने पिडीत मुलीला ओझर ता . जुन्नर येथील एका मंदीरामध्ये माळ घालून आपले लग्न झाले असल्याचे सांगितले . त्यानंतर आरोपीने पिडीत मुलगी हिला गोल्हेगाव ता . शिरूर जि . पुणे येथे नेवून एका खोलीमध्ये ठेवले होते . तेथेही आरोपीने पिडीत मुलीसोबत बळजबरीने शारिरीक संबंध केले . या ठिकाणी भिंगार कॅम्प पोलिसांनी पिडीत मुलगी व आरोपीयांना ताब्यात घेवून पोलिस स्टेशनला घेवून आले . तेथे पिडीत मुलीचा जबाब पोलिसांनी घेतल्यानंतर आरोपी विरूध्द भा.द.वि. कलम ३७६ ( २ ) ( एन ) तसेच पोक्सो कायदा कलम ४,५ ( २ ) ( जे ) ( एल ) , ६,८ नुसार कलम वाढविण्यात आले . पिडीतेचा जबाब नोंदविल्यानंतर तिची वैद्यकिय तपासणी केली असता , ती सोळा आठवडयाची गरोदर असल्याची माहिती निदर्शनास आली . तपासाअंती तपासी अमंलदार पोलिस उप निरीक्षक , एम . के . बेंडकोळी यांनी आरोपी विरुध्द मे . कोर्टात दोषारोपत्र दाखल केले . सदर खटल्यात सरकार पक्षातर्फे १८ साक्षीदार तपासण्यात आले . त्यामध्ये फिर्यादी , अल्पवयीन पिडीत मुलीची साक्ष , पंच साक्षीदार , तपासी अधिकारी , वैद्यकिय अधिकारी तसेच वयासंदर्भात महानगर पालिका अधिकारी तसेच मुख्याद्यापक , रासायनिक विश्लेषक तज्ञ यांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या . तसेच सरकार पक्षाचा युक्तिवाद व आलेला पुरावा ग्राहय धरून आरोपी नामे गणेश शहाजी परकाळे यास मा . न्यायालयाने वरिल प्रमाणे शिक्षा ठोठावली . सदर खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील अॅड . मनिषा पी . केळगंद्रे - शिंदे यांनी पाहिले . त्यांना पैरवी अधिकारी गोडे मॅडम , राठोड - वडते मॅडम , दांगोडे मॅडम यांनी सहकार्य केले . अहमदनगर ता . २२ / ० ९ / २०२२ 

( ॲड . मनिषा पी . केळगंद्रे- शिंदे )

 विशेष सरकारी वकील , अहमदनगर मो . ९ ८५०८६०४११,

८२०८ ९९ ६७ ९ ५