श्रीगोंदा येथील मोक्का व दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेला सराईत गुन्हेगार अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या धडक कारवाईत जेरबंद.
प्रतिनिधी:- संभाजी शिंदे खेडले परमानंद ,नेवासा
सदर गुन्हेगारांविरुद्ध राजाराम चंदर ढवळे राहणार राजापूर तालुका श्रीगोंदा या शेतकऱ्यांनं फिर्याद दिली होती की सदर इसम हा राजापुर येथील माझ्या शेतातून शस्त्राचा धाक दाखवून दमदाटी करून नदीलगतच्या माझ्या शेतातून जेसीबी व पोकलेड च्या साह्याने बळजबरी माती घेऊन गेला. सदर घटनेबाबत ची फिर्याद बेलवंडी पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार आरोपीवर 227/2021 भादविक 395 सह आर्म ॲक्ट 3/25,4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुन्ह्याच्या तपासात आरोपीविरुद्ध मोक्का कायद्यानुसार 3(1)(II),3(2),3(4) प्रमाणे कलम लावण्यात आले.
मोक्का व दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार असलेल्या आरोपीचा शोध घेण्याकरिता पोलीस अधिक्षक अहमदनगर
मनोज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गुन्ह्याचा तपास करण्याबाबत सूचना दिल्या.
पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक श्रीगोंदा परिसरात रवाना झाले. पेट्रोलिंग दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला या गुन्ह्यात पाहिजे असलेल्या गुन्हेगार बाबत गुप्त बातमी द्वारे माहिती मिळाली की आरोपी रामचंद्र घावटे राहणार शेळकेवाडी राजापूर हा त्याच्या वडिलांच्या वर्षश्राद्धाला त्याच्या राहत्या घरी येणार आहे. क्षणाचाही विलंब न करता पोलीस पथक सज्ज झाले. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल बबन मखरे, सुनील चव्हाण, दत्ता हिंगडे, पोलीस नाईक विशाल दळवी, शंकर चौधरी पोलीस कॉन्स्टेबल आकाश काळे व वाहन चालक हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत कुसळकर यांनी नमूद गुन्ह्यातील आरोपीस सापळा रचून नमूद केलेल्या ठिकाणी मोठ्या शिताफीने पकडले त्याला नाव गाव विचारले. पोलिसांना हवा असलेला आरोपी हाच असल्याची खात्री झाल्यानंतर. गुन्ह्याची विचारपूस केली असता सदर आरोपींने गुन्ह्याची कबुली दिली .
त्याला पुढील तपासा करता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेलवंडी पोलीस ठाण्यात हजर केले.
आरोपी चंदू उर्फ चंद्रकांत घावटे याच्यावर पुणे व अहमदनगर जिल्ह्यात मोक्का , खून करण्याचा प्रयत्न, दरोडा, दरोड्याची तयारी, जबरी चोरी व गंभीर दुखापत अशा विविध गुन्ह्याच्या नोंदी आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अहमदनगर मनोज पाटील , अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, कर्जत विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व आमदार यांनी केली.