राहुरी व्यापारीअसोसिएशन तर्फे नवनिर्वाचित नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांचा जंगी सत्कार, शहराच्या विकासासाठी आणि समस्या निवारण्यासाठी व्यापाऱ्यांनी मांडले गाऱ्हाणे

राहुरी व्यापारीअसोसिएशन तर्फे नवनिर्वाचित नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांचा जंगी सत्कार, शहराच्या विकासासाठी आणि समस्या निवारण्यासाठी व्यापाऱ्यांनी मांडले गाऱ्हाणे

*राहुरी व्यापारी असोसिएशनतर्फे नवनिर्वाचित नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांचा जंगी सत्कार*

*शहराच्या विकासासाठी आणि समस्या निवारणासाठी व्यापाऱ्यांनी मांडले गाऱ्हाणे

           राहुरी नगरपालिकेच्या नूतन निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचा गौरव आणि शहराच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी राहुरी व्यापारी असोसिएशनच्या वतीने विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष श्री. भाऊसाहेब मोरे व उपनगराध्यक्ष श्री. गजानन सातभाई यांचा असोसिएशनच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.

          कार्यक्रमाच्या सुरुवातीला राहुरी व्यापारी असोसिएशनचे प्रकाश पारख यांनी नूतन नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष तसेच सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचे अभिनंदन केले. राहुरी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी व्यापारी वर्ग पालिकेच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

व्यापाऱ्यांनी मांडल्या प्रमुख मागण्या आणि समस्या:

          या सत्कार समारंभाचे औचित्य साधून व्यापारी असोसिएशनने शहराच्या प्रलंबित समस्यांकडे नूतन पदाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. यामध्ये प्रामुख्याने खालील मागण्या मांडण्यात आल्या:

              अश्वारूढ पुतळा: अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा पूर्व नियोजित जुन्या पाण्याच्या टाकीच्या जागेतच लवकरात लवकर उभारण्यात यावा.बाजारपेठेतील कचरा वेळेवर उचलण्यासाठी स्वतंत्र घंटागाडी उपलब्ध करून द्यावी. शहरातील वाढती वाहतूक कोंडी पाहता पार्किंगसाठी 'सम-विषम' (P1-P2) तारखांची अंमलबजावणी करावी.बाजारपेठेतील रस्ते तातडीने खड्डेमुक्त करावेत, शहरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आणि महामार्गावर पांढरे पट्टे (झेंब्रा क्रॉसिंग) आखण्यात यावेत.गुरुवारच्या आठवडे बाजाराचे योग्य नियोजन करावे. तसेच अग्निशमन दल, रुग्णालय परिसरात बसणाऱ्या व्यावसायिकांना पर्यायी जागा उपलब्ध करून देऊन त्या परिसरातील अडथळा दूर करावा.शहराचे विद्रुपीकरण थांबवण्यासाठी फ्लेक्स बोर्ड लावण्याबाबत कडक नियमावली तयार करावी.

           या प्रसंगी नंदूशेठ भट्टड, विलास तरवडे, बाळासाहेब उंडे, सूर्यकांत भुजाडी, अनिल कासार, संजीव उदावंत, ॲड. संतोष आळंदे, गणेश नेहे, लक्ष्मीकांत तनपुरे, संतोष लोढा, नवनीत दरक, एकनाथ खेडेकर, अनिल भट्टड, प्रवीण ठोकळे, महादेव बिडवे, मच्छिंद्र गुलदगड, आबा शेटे, सचिन जाधव, सुनील देशपांडे यांसह राहुरीतील मोठ्या संख्येने व्यापारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आभार देवेन्द्र लांबे यांनी मानले. नवनिर्वाचित नगरध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी सर्व समस्या प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन व्यापाऱ्यांना दिले आहे.