स्थानिक गुन्हे शाखेने प्रवरासंगम बस स्टॅन्ड वर लावलेल्या सापळ्यात मुद्देमालासह आरोपी अडकला.
प्रतिनिधी :-संभाजी शिंदे खेडले परमानंद ,नेवासा
विभागीय पोलीस आयुक्त नाशिक यांनी दिलेल्या आदेशानुसार रेकॉर्डवरील गुन्हेगारांची शोध मोहीम व त्यांच्या हालचालींचा आढावा घेण्यासाठी पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी मोहीम राबवली. याच मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेला अनेक गुन्हेगारांकडून अवैधरित्या शस्त्र बाळगणारे अनेक गुन्हेगार सापडले.
पोलीस अधीक्षक अहमदनगर मनोज पाटील यांनी यापूर्वी सापडलेल्या गुन्हेगारांच्या अनुषंगाने शोध मोहीम आणखी तीव्र केली. व याचाच परिणाम म्हणजे चांदा तालुका नेवासा येथील घटनेनंतर आज प्रवरासंगम येथे एका इसमास स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांनी गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह पकडले.
सविस्तर वृत्तांत असा आहे की स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी अनील कटके यांनी आदेश काढले की अवैध शस्त्र बाळगणाऱ्या विरुद्ध शोध मोहीम तीव्र करण्यात यावी.
याच आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार हे अहमदनगर जिल्ह्यातील अवैधरित्या गावठी कट्टे आणि शस्त्र बाळगणाऱ्या आरोपींचा मागोवा घेत असताना.
दिनांक 4/6/ 2022 रोजी पोलीस निरीक्षक अनिल कटके स्थानिक गुन्हे शाखा यांना गुप्त सूत्राकडून गोपनीय सुगावा लागला की प्रवरा संगम बस स्टॅन्ड जवळ एक मध्यम बांध्याचा मुलगा देशी बनावटीचा कट्टा व काडतुसांची विक्री करण्यासाठी येणार आहे. माहितीची विश्वसनीयता लक्षात घेता क्षणाचाही विलंब न करता पोलीस निरीक्षक अनिल कटके व फौज फाटा घटनास्थळी सापळा रचून सज्ज झाले. यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल दत्तात्रय गव्हाणे, मनोज गोसावी, पोलीस नाईक, ज्ञानेश्वर शिंदे, शंकर चौधरी, दीपक शिंदे, शिवाजी ढाकणे, संभाजी कोतकर यांना तोंडी स्वरूपात विशेष सूचना देऊन आखणी करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेने लावलेल्या ट्रेपमध्ये आरोपी अडकला गेला. त्याच्या संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवून सदर इसम हाच व्यक्ती आहे याची खात्री केली.
त्याला पोलिसी खाक्या दाखवून त्याला त्याचे नाव विचारले. त्याने त्याचे नाव सोन्या उर्फ संतोष पांडुरंग वंगाळ ( वय 29)असे सांगितले. राहणार रोटेगाव तालुका वैजापूर जिल्हा औरंगाबाद. पोलिसांना खात्री पटल्यानंतर पोलिसांनी या आरोपींची झडती घेतली असता त्याच्याकडे दोन जिवंत काडतुसे, देशी बनावटीचे गावठी पिस्तूल, असा 30,400 रुपये किंमतीचा मुद्देमाल सापडला.
सदरची कारवाई माननीय पोलीस महानिरीक्षक नाशिक यांच्या विशेष आदेशाने व माननीय पोलीस अधीक्षक अहमदनगर यांच्या आदेशान्वये अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, विभागीय पोलीस अधिकारी शेवगाव सुदर्शन मुंढे, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली
.