नवनागापुर, एमआयडीसी खुन प्रकरणातील फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगरकडुन जेरबंद.

नवनागापुर, एमआयडीसी खुन प्रकरणातील फरार आरोपी     स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगरकडुन जेरबंद.

अहमदनगर प्रतिनिधी/

प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, फिर्यादी काजल स्टीफन मिरपगार  रा. नवनागापुर, ता. नगर यांचे पती अविनाश मिरपगार हे आंधळे चौक, नवनागापुर येथे उभे राहुन, फोनवर व्हिडीओ कॉल करुन बोलत असतांना एक इसम संग्राम कदम व त्याचे इतर 4 साथीदार या ठिकणी आले व अविनाश मिरपगार हा व्हिडीओ काढत असल्याने त्याला शिवीगाळ व मारहाण करुन त्यास सिमेंट ब्लॉक डोक्यात मारुन जिवे ठार मारले या बाबद एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. 502/2024 भादविक 302, 504, 506, 143, 147, 148, 149 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदरचा गुन्हा दाखल झाल्यापासुन आरोपी  किरण गव्हाणे रा. शनिशिंगणापुर , नेवासा हा फरार होता.

पोलीस अधीक्षक राकेश ओला  अहमदनगर यांनी पोनि/ दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना वर नमुद खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेण्या बाबत आदेशित केले होते.

नमुद आदेशान्वये पोनि  दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/तुषार धाकराव व अंमलदार दत्तात्रय गव्हाणे, रविंद्र कर्डीले, ज्ञानेश्वर शिंदे, संदीप दरदंले, देवेंद्र शेलार, फुरकान शेख व मेघराज कोल्हे अशांचे पथक नेमुन गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले. स्थागुशा पथक फरार आरोपीचा तांत्रिक विश्लेषणाचे आधारे शोध घेत असतांना पथकास गुप्तबातमीदारा मार्फत आरोपी  किरण गव्हाणे शनिशिंगणापुर,  नेवासा हा त्यांचे राहते घरी आला असुन आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकाने आरोपीचे वास्तव्याबाबत माहिती घेवुन, बातमीतील वर्णना प्रमाणे एक इसम मिळुन आल्याने त्यास शिताफीने ताब्यात घेतले. त्यास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव  किरण बाळासाहेग गव्हाणे   शनिशिंगणापुर, नेवासा असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे वर नमुद गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपुस करता त्याने गुन्हा केल्याचे सांगितल्याने त्यास ताब्यात घेवुन एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस स्टेशन करीत आहे.

सदरची कारवाई राकेश ओला  पोलीस अधीक्षक, अहमदनगर,  प्रशांत खैरे  अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर व संपत भोसले  उविपोअ, नगर ग्रामिण विभाग यांच्या सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.