मारिया भवन बाभळेश्वर येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

मारिया भवन बाभळेश्वर येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
मारिया भवन बाभळेश्वर येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

  बाभळेश्वर ( प्रतिनिधी) :- राहाता तालुक्यातील बाभळेश्वर येथे सलेशियन सिस्टर्स ऑफ डाॅन बास्को यांच्या वतीने रविवार दिनांक १७/०३/२०२४ रोजी मारिया भवन बाभळेश्वर येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

       महिला दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अहमदनगर येथील संचालिका ऑक्सीलियम काॅन्हव्हेन्ट स्कूलच्या सर्वेसर्वा सिस्टर रिटा लोबो यांनी स्विकारले त्याप्रसंगी स्त्री कुटुंबाचा प्रकाशाचा दिवा या विषयावर त्यांनी आपले सूदंर असे मनोगत व्यक्त केले.तसेच प्रमुख पाहुणे म्हणून राहाता येथील जिल्हा परिषद शिक्षिका संगिता लोंढे ह्या होत्या.त्याचबरोबर बाभळेश्वर धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरू रे.फा.अब्राहम रणनवरे ,उद्योजक, अशोक बॅकेचे संचालक जितेंद्र तोरणे, समाजसेवक, दिपक कदम, अन्याय अत्याचार निर्मुलन समितीच्या जिल्हा अध्यक्ष रमादेवी धिवर, श्रीरामपूर आर.पी.आय.चे शहराध्यक्ष उजवळाताई येवलेकर, राहुरी येथील रमाई बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष स्नेहल सांगळे व तालुका अध्यक्ष ज्योती ताई पलघडमल इ.प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.या सर्व कार्यक्रमाचे आयोजन अनिता ग्रसिअस व मारिया भवन व स्टाफ यांनी केले होते.तसेच सर्व महिला बचत गट ,बाळ येशू युथ ग्रुप यांचे सदस्य उपस्थित होते.त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर महिलांची उपस्थिती या कार्यक्रमाप्रसंगी होती.