ॲड .सुरेश दिनकरराव तांबे यांची नोट रिपब्लिक भारत सरकार या पदी नियुक्ती .
राहुरी न्यायालयात वकिली करणारे ॲड . सुरेश दिनकरराव तांबे यांची नोट रिपब्लिक भारत सरकार या पदी नुकतीच नियुक्ती झाली आहे. मागील वर्षी 2023 मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री आप लो व लॉ अँड जस्टीक गव्हर्मेंट ऑफ लीगल अफेयर्स नोटरी सेल दिल्ली यांच्यामार्फत मागील वर्षी सन 2023 मध्ये आपण अपॉइंटमेंट ऑफ नोटरी साठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया व ऑनलाईन मुलाखती पूर्ण होऊन दिनांक 14 मार्च 2024 रोजी नोट रिपब्लिक भारत सरकार म्हणून नियुक्ती झालेल्या उमेदवारांची यादी जाहीर झाली. खेडले परमानंद येथील एडवोकेट सुरेश दिनकरराव तांबे यांची नोट रिपब्लिक भारत सरकार म्हणून नियुक्ती झाली आहे. एडवोकेट तांबे हे राहुरी, नेवासा, अहमदनगर या न्यायालयात वकिली करीत असून त्यांची नोटरी पब्लिक भारत सरकार म्हणून नियुक्ती झाल्याने परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे. एडवोकेट सुरेश दिनकर तांबे हे एका मोलमजुरी करून उपजीविका भागवणाऱ्या कुटुंबातून आलेले असून त्यांच्या यशाचे खरे मानकरी त्यांचे आई वडील व बहीण असून त्यांनी अहोरात्र काबाडकष्ट करून तांबे यांना यशाच्या शिखरावर नेवून ठेवले आहे. तसेच एडवोकेट तांबे यांचे परममित्र पोपटराव आघाव व आघाव परिवार यांचा ही मोलाचा वाटा आहे. आपल्याजवळ जिद्द व चिकाटी असेल तर आपण कोणत्याही परिस्थितीत कुठल्याही संकटावरती मात करून यशस्वी होऊ शकतो हे एडवोकेट तांबे यांनी दाखवून दिले आहे. एडवोकेट तांबे यांचे आई वडील व बहिण आशा साळवे यांनी मोलमजुरी करून एडवोकेट तांबे यांच्या शिक्षणासाठी अहोरात्र प्रयत्न केलेले आहेत. त्यांच्या या यशात त्यांची पत्नी सौ. अस्मिता तांबे यांचाही मोलाचा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले. तांबे हे सामाजिक कार्याचे पुरस्कर्ते असून फुले शाहू आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते आहेत.