शेतीमध्ये काम करणाऱ्या कटूंबावर कोयता व दगडाने हल्ला,7 जनांवर गुन्हा दाखल, सदर घटनेने परिसरात खळबळ .

शेतीमध्ये काम करणाऱ्या कटूंबावर कोयता व दगडाने हल्ला,7 जनांवर गुन्हा दाखल, सदर घटनेने परिसरात खळबळ .

अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी // संभाजी शिंदे

शेतीमध्ये काम करणाऱ्या कटूंबावर कोयता व दगडाने हल्ला,7 जनांवर गुन्हा दाखल, सदर घटनेने परिसरात खळबळ .

              

 नेवासा तालुक्यातील सोनई पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वंजारवाडी येथे शेतात काम करणाऱ्या पती पत्नीवर सात जनांनी कोयता व दगडांनी मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

     

         सदर घटनेची हकिकत अशी की बाबासाहेब श्रीधर कुरकुटे व संगिता बाबासाहेब कुरकुटे हे दिनांक9/4/2024 रोजी वंजारवाडी शिवारातील शेतीमध्ये काम करत असतांना सविताढोबळे यांनी त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केला व पाराजी ढोबळे याने दगडाने हल्ला करून जखमी केले .नामदेव ढोबळे, आसराबाई ढोबळे, सुभाष ढोबळे, रविंद्र ढोबळे, विशाल ढोबळे ही गैर कायद्याची मंडळी जमवून कुरकुटे पती पत्नीस लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे .

 

          वरिल सर्व घटनेप्रमाणे सोनई पोलिसस्टेशन येथे गुहा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक फौजदार के. बी . शेख हे करत आहेत .