लाईफ इन मल्टीस्पेसिएलिटी हॉस्पिटल राहुरी येथे दिव्यांगाचे सर्व रोग निदान शिबिर संपन्न,दिव्यांग रुग्णावर करणार सवलतीत उपचार -श्री .धनंजय पानसंबळ .

लाईफ इन मल्टीस्पेसिएलिटी हॉस्पिटल राहुरी येथे दिव्यांगाचे सर्व रोग निदान शिबिर संपन्न,दिव्यांग रुग्णावर करणार सवलतीत उपचार -श्री .धनंजय पानसंबळ .

*लाईफ इन मल्टीस्पेसिएलिटीहॉस्पिटल, राहुरी येथे दिव्यांगाचे सर्व रोग निदान शिबीर संपन्न*

 

*लाईफ इन हॉस्पिटल करणार दिव्यांग रुग्णांवर सवलतीत उपचार - श्री धनंजय पानसंबळ*

 

               राहुरीतील लाईफ इन हॉस्पिटल राहुरी तसेच दिव्यशक्ती सेवा संस्था राहुरी,मराठा एकीकरण समिती राहुरी,यांच्या संयुक्त विद्यमाने 3 ऑगस्ट रोजी दिव्यांगासाठी चे सर्व रोग निदान शिबिर संपन्न झाले यामध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक म्हाळु पाचारणे साहेब होते. प्रमुख उपस्थिती सेवानिवृत्त मेजर सोपानराव पागिरे साहेब, सेवानिवृत्त शिक्षक बाबुराव शिंदे, दादासाहेब मोरे सर, हॉस्पिटलचे संचालक श्री धनंजय पानसंबळ साहेब ,डॉ मंगेश बागडे मराठा एकीकरण समितीचे संस्थापक समन्वयक/शिवसेना तालुकाध्यक्ष देवेंद्र लांबे पाटील, दिव्यांग शक्ती सेवा संस्थेचे अध्यक्ष मधुकर घाडगे, सल्लागार सलीमभाई शेख हे होते.

           

              प्रास्ताविकामध्ये मधुकर घाडगे यांनी सांगितले लाईफ इन हॉस्पिटल हे 24 तास सुरू असून डॉ नीरज मोरे (MBBS ,DNB Medicin)हे या हॉस्पिटल मध्ये सेवा देण्यास कटिबद्ध आहेत ,महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना तसेच कॅशलेस उपचार सुविधा , मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष तज्ञ डॉक्टर्स व स्टॉप एका ठिकाणी सर्व आजाराचे निदान व उपचार उपलब्ध आहेत. तसेच चार बेडचे डायलिसिस सेंटर असून विविध योजने मधून मोफत डायलिसिस सेवा मिळत आहे. 

             

                  देवेंद्र लांबे पाटील यांनी बोलतांना म्हंटले की मराठा एकीकरण समितीच्या माध्यमातून हॉस्पिटल मधील ज्या रुग्णांच्या जेवणाची सोय होत नसेल त्यांना जागेवर जेवणाची सुविधा पुरवणार आहोत. तसेच लवकरच राहुरी तालुक्यामध्ये मराठा भवन उभारणार आहोत त्यामध्ये दिव्यांगाच्या विरंगुळा केंद्रासाठी तळमजला राखीव ठेवण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात येईल.राहुरी तालुक्यात शासनाच्या सर्व वैद्यकीय योजना लाईफ इन हॉस्पिटल येथे उपलब्ध करून दिल्या बद्दल संचालक श्री धनंजय पानसंबळ व डॉ.मंगेश बागडे यांचे आभार मानले.

           लाईफ इन हॉस्पिटलचे संचालक धनंजय पानसंबळ यांनी या प्रसंगी दिव्यांग बांधवांसाठी उपचारात ४०% सवलत व औषधांमध्ये २०% सवलत देण्याचे जाहीर केले.

              कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हाळू पाचारणे हे म्हणाले की लाईफ इन हॉस्पिटल येथे मी स्वतः उपचार घेतलेले आहे.हॉस्पिटल मधील सेवा देणारे कर्मचारी देवदूत बनून रुग्णांची सेवा करत आहेत.या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना रेल्वे पासचे वाटप करण्यात आले.

                कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रहारचे जिल्हा समन्वयक आप्पासाहेब ढोकणे यांनी केले.कार्यक्रम पार पाडण्यासाठी डॉ.मंगेश बागडे,महेंद्र शेळके,गौरव जाधव व प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष योगेश लबडे तालुका सचिव दत्तात्रय खेमनर, संपर्कप्रमुख रवींद्र भुजाडी,तालुका संघटक राजेंद्र आघाव, अनामिका हरेल, सुखदेव कीर्तने, भारत अढाव व आभार तालुका सचिव दत्तात्रय खेमनर यांनी मानले.