बीड जिल्ह्यातील कहार समाजाच्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी निषेध नोंदवून कहार बांधवांचा नेवासा येथे निषेध मोर्चा.
प्रतिनिधी :-संभाजी शिंदे ,नेवासा
तलवडा पोलिस स्टेशन अंतर्गत (ता.गेवराई जिल्हा.बीड)येथील कहार समाजातील 6वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरनी गुन्हा दाखल केलेला आहे परंतु सदर आरोपी हा फरार झालेला आहे त्या आरोपीस तात्काळ अटक करण्यात यावी सदरील गुन्हांचा खटला जलदगतीने न्यायालयात चालवून आरोपीस कठोर शिक्षा करण्यासाठी शासनातर्फे विधिज्ञ अॅड. उज्वल निकम साहेब यांची नियुक्ती करून आरोपीस फाशीची शिक्षा होण्याची कार्यवाही व्हावी तसेच पिडीत मुलीला शासनाकडून ``मनोधैर्य योजना,,निधी त्वरित उपलब्ध करून देण्यात यावा व त्या मुलीला व त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला या करिता आज 9मे रोजी नेवासा शहरातील कहार समाजाच्या वतीने निषेध करून मोर्चा काढण्यात आला व नेवासा तहसीलदार व नेवासा पोलिस स्टेशन यांना निवेदन देण्यात आले या वेळी नेवासा शहरातील शेकडो कहार बांधव उपस्थित होते