तिन वर्षापासून फरार आरोपी अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला.अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे दमदार कारवाई.

तिन वर्षापासून फरार आरोपी अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला.अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे दमदार कारवाई.

प्रतिनिधी:- नेवासा

     राजीव गांधी पत संस्थेच्या चिखली तालुका श्रीगोंदा येथून घेतलेल्या २,५५,००० कर्ज रकमेसाठी दिलेला रकमेचा चेक बाउन्स झाल्याने गोरख भाऊसाहेब झेंडे या इसमा विरुद्ध N.I.A. Act१३८ प्रमाणे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी अहमदनगर यांनी संक्षिप्त फौजदारी क्र २७३४/२०१४ नुसार खटला चालवून फिर्यादीस १८ अठरा महिने कारावास व २,५५,००० नुकसान भरपाई देण्याचा आणि नुकसान भरपाई न दिल्यास सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा भोगण्याचे आदेश दिले होते.

     परंतु सदर इसमाने न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याने त्यांच्याविरुद्ध कायदेशीर Conviction Warrnt काढण्यात आले. व पथकामार्फत बजावणी करण्यासाठी आदेश दिले.

    न्यायालयाचे आदेश मिळताच पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार यांच्या विशेष पथकाची नेमणूक 

करून कारवाई करण्याचे आदेश दिले.

       या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी आमलदार, पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली कन्व्हेंशन वारंट मधील इसमाचा शोध घेत असताना पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गोपनीय माहिती द्वारे समजले की सदर इसम गोरक झेंडे चिखली तालुका श्रीगोंदा येथे आपल्या राहत्या घरी आला असून ,आता गेल्यास मिळून येईल.

        गुप्त खबऱ्याकडून अशी पक्की खात्रीशीर माहिती मिळताच . स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल फकीर शेख, देवेंद्र शेलार, पोलीस नाईक शंकर चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र घुंगासे, रोहिदास नवगिरे या पथकाने संबंधित व्यक्तीच्या घरी जाऊन घराच्या परिसरात शोध घेत असताना एक इसम संशयास्पद रित्या फिरताना दिसल्याने त्याला त्याचे नाव व पत्ता विचारले असता सुरुवातीस तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला.

            त्याला संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी विश्वासात घेऊन कसून चौकशी केली असता तो गोरख भाऊसाहेब झेंडे असल्याचे निष्पन्न झाले.

          व त्याच क्षणी त्याला अटक करून बेलवंडी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले.

        सदर घटनेचा पुढील तपास बेलवंडी पोलीस स्टेशन करीत आहे.

       सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अहमदनगर मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केला.