राहुरी तालुक्यातील वळण येथे काही समाजकंटकांनी एका सायंदैनिकाचे वृत्तपत्र जाळण्याची घडली घटना, सर्व पत्रकारांनी पोलीस प्रशासनाला निवेदन देत केला निषेध व्यक्त .
राहुरी तालुक्यातील वळण येथे एका सायं दैनिकाचे समाज कंटकांनी वृत्तपत्र जाळल्याची घटना घडली असुन याबाबत राहुरी तालुक्यातील सर्व पत्रकारांनी पोलीस प्रशासनाला निवेदन देत निषेध व्यक्त केला आहे.
अवैध व्यवसायाची बातमी सायं.दैनिक सार्वमंथन वृत्तपत्रात बातमी छापून आली होती.
राहुरी तालुक्यातील वळण येथील अवैध व्यवसाय करणाऱ्या व गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्यांची बातमी सायं.दैनिक सार्वमंथनने प्रकाशित केल्याचा राग मनात धरून शनिवार दिनांक ७ मे रोजी सायं.दै.सार्वमंथन या अंकाचे पार्सल एका ठिकाणी होते.यातील जगन्नाथ व कुशिराम,राहणार प्रिंप्री-वळण हे दोन्ही दारूच्या खुप नशेत होते. जेथे अंक ठेवले होते त्या टपरीवर गलुलिचे खडे मारत.. परत या ठिकाणी पेपर ठेवायचे नाही असे म्हणत पेपरचे पार्सल हिसकावुन घेत रस्त्यावर जाळले...व गावात दहशत माजवली.
अशा समाजकंटक प्रवृत्ती वर कठोर कारवाई करावी व संपादक यांना पोलीस संरक्षण मिळावे अशी विनंती यावेळी करण्यात आली आहे.
निवेदन देण्यासाठी अधिसिकृती धारक पत्रकार निसार भाई सय्यद, अनिल कोळसे , रफिक शेख,गणेश विघे, कर्णा जाधव,आकाश येवले, विजय येवले, प्रसाद मैड ,अनिल देशपांडे, विलास कुलकर्णी, श्रीकांत जाधव, राजेंद्र वाडेकर, राजेंद्र उंडे,संजय कुलकर्णी, रुषीकेश राउत,सोमनाथ वाघ, मनोज साळवे, मनिष पटेकर,सतिश फुलसौंदर,शरद पाचरणे ,संतोष जाधव,संजय संसारे, वृत्तपत्र विक्रेता अल्ताफ शेख आदि उपस्थित होते.