जीवनाला कलाटणी देणारा गुरु म्हणजे शिक्षक:-सलाबतपूर ग्रामपंचायत सदस्य राहुल डोळस....
जीवनाला कलाटणी देणारा गुरु म्हणजे शिक्षक:-सलाबतपूर ग्रामपंचायत सदस्य राहुल डोळस....
नेवासा प्रतिनिधी//
गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने सलाबतपूर येथील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना व माध्यमिक विद्यालयांच्या विद्यार्थ्यांना राहुल डोळस व सर्व मित्र परिवाराच्या वतीने यांच्यावतीने खाऊन चे वाटप....

यावेळी राहुल डोळस बोलताना म्हणाले की आपल्या सर्वांचे प्रथम गुरु हे आई वडील असतात सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांचा आदर करावा रोज शाळेत येताना दर्शन घ्यावे शिक्षकाप्रती आपली नेहमी कायमस्वरूपी कृतज्ञता राहिली पाहिजे शिक्षक हे आपले जीवनातील महत्त्वाचे गुरु असून आयुष्याची कलाटणी देण्यासाठी आपल्या जीवनामध्ये शिक्षकाचा मोलाचा वाटा असतो प्रार्थमिक शाळेचे शिक्षक हे जीवणाला कलाटणी देणारे असून त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
म्हणूनच आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिक्षक वृंदाचे पूजन व सन्मान करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलो आहे अशी भावना सलाबतपुर ग्रामपंचायत सदस्य राहुल डोळस यांनी व्यक्त केली. ते सलाबतपुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच रयत शिक्षण संस्थेच्या विद्यालयामध्ये बोलत होते.
कार्यक्रमाच्या आयोजक सलाबतपुर ग्रामपंचायत सदस्य राहुल डोळस , जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र भांड, सदस्य कमिटी नवनाथ कदम, सोपान चावरे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापकमुख्याध्यापक झावरे सर, राजेंद्र मुंगसे, राहुल लोखंडे, सलीम शेख, विठ्ठल घोडके, कलापुरे मॅडम, कोल्हे मॅडम,
रयत शिक्षण संस्था माध्यमिक विद्यालय मरकड सर, इटकर सर ,आहेर सर, तसेच इतर सर्व शिक्षक रुंद व विद्यार्थी व विद्यार्थिनी शालेय व्यवस्थापक समिती उपस्थित होते.
गुरुपौर्णिमेच्या प्रसंगी शाळेमध्ये राहुल डोळस व कमिटीच्या वतीने खाऊ वाटप करण्यात आले ....








