वकिल पती पत्नी हत्याकांड प्रकरणाचा लागला छडा, स्थानिक गुन्हे शाखेने घेतले आरोपी ताब्यात, गुन्हा केल्याचे दिली कबुली .

वकिल पती पत्नी हत्याकांड प्रकरणाचा लागला छडा, स्थानिक गुन्हे शाखेने घेतले आरोपी ताब्यात, गुन्हा केल्याचे दिली कबुली .

             पक्षकार व वकिल यांच्यात अवघ्या २० हजार रुपयांच्या फि वरुन वाद निर्माण होऊन पक्षकाराने वकील पती पत्नीचा खूण करून मृतदेह उंबरे येथील एका विहीरीत टाकून दिले. राहुरी तालूक्यात काल दिनांक २५ जानेवारी २०२४ रोजी घडलेल्या या दुहेरी हत्याकांडाने तालुक्यासह नगर जिल्हा हादरुन गेला. 

          ॲड. राजाराम जयवंत आढाव, वय ५२ वर्षे, तसेच ॲड. मनीषा राजाराम आढाव, वय ४२ वर्षे, हे वकिल दाम्पत्य राहुरी तालूक्यातील मानोरी येथील आढाव वस्ती येथे राहत असून ते दोघेही राहुरी येथील न्यायालयात वकिली व्यवसाय करत होते. ॲड. राजाराम आढाव हे काल दिनांक २५ जानेवारी २०२४ रोजी दुपार पर्यंत राहुरी येथील न्यायालयात त्यांचे कामकाज करत होते. त्यानंतर दुपारी दोन वाजे दरम्यान ते अहमदनगर येथे गेले. त्यानंतर त्यांनी एका पक्षकाराला पाठवून त्यांच्या पत्नी ॲड. मनीषा आढाव यांना बोलावून घेतले. अशी माहिती मिळाली आहे. तेव्हापासून आढाव हे दोघे पती पत्नी बेपत्ता आहेत. आज दिनांक २६ जानेवारी २०२४ रोजी पहाटे दोन वाजे ॲड. राजाराम आढाव यांची फियस्टा कंपनीची चारचाकी गाडी क्रमांक एम एच १७ ए इ २३९० ही गाडी राहुरी शहरातील न्यायालय परिसरात बेवारस मिळून आली. पहाटे पोलिस पथक गाडी जवळ पोहचले तेव्हा त्यावेळी ॲड. आढाव यांच्या गाडी जवळ दुसरी एक डस्टर गाडी उभा होती. मात्र पोलिस गाडी आल्याचे पाहताच सदर डस्टर गाडी त्या ठिकाणाहून सुसाट वेगात निघून गेली. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने ॲड. आढाव यांची चारचाकी गाडी ताब्यात घेतली. त्या गाडीची तपासणी केली असता गाडीत एक हातमोजा, दोर व एक बूट आढळून आला. तपासा दरम्यान पोलिस पथकाला आज दुपारी १२ वाजे दरम्यान आढाव यांची दुचाकी क्र. एम एच १७ ए डब्लू ३२०७ ही गाडी राहुरी येथील न्यायालयाच्या मागील परिसरात बेवारस मिळून आली. तसेच आढाव यांचे एटीएम कार्ड राहुरी येथील आयसीआयसीआय बँके समोर बेवारस मिळून आले. 

          घटनेनंतर अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथक व राहुरी पोलीस पथक आढाव दाम्पत्यांचा शोध घेत होते. या दरम्यान जिल्हा पोलिस प्रमुख राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथकाचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, हवालदार मनोज गोसावी, गणेश भिंगारदिवे, रणजीत जाधव, सचिन आडबल, रवींद्र कर्डिले, दत्तात्रय गव्हाणे, संदीप पवार, सागर ससाने, अमृत आढाव, फुरकान शेख, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे, चंद्रकांत कुसळकर, संभाजी कोतकर आदि पोलिस पथकाने सदर डस्टर गाडीचा शोध घेऊन उंबरे येथील किरण नामक व आणखी एक अशा दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी घटनेची माहिती दिली. 

            आरोपींनी दिनांक २५ जानेवारी २०२४ रोजी दुपारी आढाव दाम्पत्याचे अपहरण करून त्यांना त्यांच्या मानोरी येथील घरी घेऊन गेले. तेथे दोघांचा खूण करून रात्रीच्या दरम्यान त्यांचे मृतदेह दगड बांधून उंबरे येथील स्मशानभूमीत असलेल्या विहिरीत टाकून दिले. आज दिनांक २६ जानेवारी २०२४ रोजी रात्री दहा वाजे दरम्यान पोलिस प्रशासनाने आढाव दाम्पत्याचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढून ताब्यात घेतले. पुढील तपास सुरु आहे. मात्र या घटनेने अहमदनगर जिल्हा हादरुन गेला.