तहसीलदार मौदा यांच्या कडून 18 दुकानदारांवर करण्यात आली अतिक्रमणची कार्यवाही ।
ब्यरो रिपोर्टर वाहिदशेख यांची विशेष बातमी -
मौदा :- तालुक्यातील माथनी टोलनाक्यावर हाईवेच्या बाजूला असलेले चहा-नाष्टा , पंक्चर दुरुस्ती व हवा भरने अशा 18 प्रकारची दुकानांवर तहसीलदार मौदा यांच्या द्वारे कोणतीही पूर्वसूचना न देता पीड़ित दुकानदारांवर अतिक्रमण कारवाई करण्यात आली. ह्या कारवाईमुळे पीड़ित दुकानदारांवर उपसमारीची वेळ आली असून यांना आपला चालता रोज़गार ही गमवावा लागला .
माथनी टोलनाक्या वरील काही कर्मचारी पीड़ित दुकानदारांना हफ्ता माँगत होते व दररोज मोफत चहा- नाश्ता सुद्धा माँगत होते .दुकानदारांनी टोलनाका कर्मचारी यांना मोफत चहा-नाष्टा न दिल्यामुळे बदला घेण्याचा उद्देशाने हाइवे विभाग व तिथल्या जनप्रतिनिधि यांनी प्रशासनला तक्रार करून 18 दुकानदारांवर जबरी कारवाई करण्यात आले असे आरोप पीड़ित दुकानदार यांनी मौदा प्रशासनांवर केला . ह्या कार्रवाईत कोरोना मध्ये पति मरण पावले अश्या निराधार महिला व अपंग व्यक्तिचे दुकानांचा ही समावेश असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे व त्यांचे खायचे वांदे झालेले आहे .
अशा परिस्थितिमध्ये या लोकांनी करायचे काय अशा प्रश्न निर्माण झाला आहे .
सदर कार्रवाईचे दखल घेऊन मा.प्रा.अवंतिका रमेश लेकुरवाळे सत्तापक्ष नेता भाँ.रा.कॉ.जिल्हा परिषद गट नागपुर यांनी प्रशासनला इशारा दिला आहे की ह्या सर्व लोकांना इथल्या स्थानीक कंपन्यामध्ये रोज़गार मिळवून द्यावे. अन्यथा येत्या सोमवारी तहसील कार्यालय मौदा येथे मोर्चा काढण्यात येईल.याप्रसंगी प्रा.अवंतिका लेकुरवाळे सोबत वंदना शिंगनजोडे सभापति पं.स.मौदा , शालिनी देशमुख जि.प.सदस्य , दुर्गा ठाकरे पं.स.सदस्य आणि सर्व पीड़ित दुकानदार उपस्थित होते .