स्वतंत्र भारताच्या 73 व्या प्रजासत्ताक दिना निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंप्रि अवघड येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप .
राहुरी तालुक्यातील पिंप्री अवघड येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विध्यार्थ्यांना स्वराज्य पोलिस मित्र संघटने तर्फे शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
आज 26 जानेवारी 73 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून स्वराज्य पोलिस मित्र संघटनेचे पदाधिकारी यांनी प्रत्यक्ष शाळेत येऊन विद्यार्थ्यांना शालेय साहित्य दिले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अनेक गरीब विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, त्यांना शिक्षण घेत असताना अनेक अडचणी येतात, शालेय साहित्य विकत घेता येत नाही म्हणून या संघटनेच्या वतीने राहुरी तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत या शालेय साहित्याचे वाटप करण्यात येत आहे.पिंप्री अवघड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेबरोबरच ,राहुरी, डिग्रस,वरवंडी येथिल शाळेतही या साहित्यांचे वाटप या संघटनेच्या पदाधिकारी यांनी केले आहे.त्यामुळे विध्यार्थी व शिक्षक यांना खूप आनंद झाला आहे तसेच स्वराज्य पोलिस मित्र, माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण संघटनेच्या या संकल्पनेचे कौतुकही करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी स्वराज्य पोलिस मित्र संघटनेचे भारत नजन(महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख),सचिन दिघे(उत्तम महाराष्ट्र अध्यक्ष)अशोक खरमाळे(उत्तर महाराष्ट्र संघटक),कृष्णा गायकवाड, शंकर काबुडके, तुकाराम कळमकर उपस्थित होते. हा कार्यक्रम करण्यासाठी गावातील सरपंच बाप्पूराव पटारे, उपसरपंच लहानु तमनर, अमोल गायकवाड, शिवाजी लांबे,शाळेचे मुख्याध्यापक बबन कुलट सर ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ,सदस्यव सर्व सहकारी शिक्षक उपस्थित होते.