अनेक वर्षांपासून प्रलंबित मांजरी -पानेगाव बंधाऱ्यासह डी वाय तीन चारीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला .
अहिल्यानगर प्रतिनिधी //संभाजी शिंदे
नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना मिळाला न्याय .
मुळा नदीपात्रातील पानेगाव मांजरी येथील बंधाऱ्याचा प्रश्न मार्गी लागला याबाबतचा सविस्तर वृत्तांत असा आहे की बंधाऱ्याचे लिकेज असल्यामुळे पाण्याचा अपव्यय व्हायचा.परिणामतः पाणी लवकर आटायचे. त्यामुळे वळण -पिंपरी ,खेडले परमानंद ,शिरेगाव ,पानेगाव ,मांजरी अशा लाभक्षेत्रातील अनेक गावांना लाभापासून वंचित रहावे लागायचे यापूर्वी ही समस्या सोडवण्यासाठी युवकांनी अनेक वेळा प्रयत्न केले होते
अनेक वर्षापासूनच्या या समस्येला न्याय मिळाल्याचे नेवासा आभार सभेत दिसून आले.
प्रभाकर शिंदे व विद्यमान आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या मार्गदर्शनाखाली जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांना निवेदन देण्यात आले .
सदर निवेदनाची दखल घेत तातडीने मांजरी पानेगाव बंधाऱ्याच्या फळ्या बदलण्याची आदेश मंत्र्यांनी दिले .
त्याचप्रमाणे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला प्रश्न म्हणजे डीवाय तीन चारी या चारीला गेल्या चार वर्षापासून पाणी येत नसल्यामुळे शेतकरी वंचित राहिले आहे या शेतकऱ्यांच्या व्यथा शिरेगाव येथील माजी सरपंच किरण जाधव अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेवासा तालुका उपाध्यक्ष संभाजी जाधव सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर जाधव यांनी मंत्री महोदयासमोर मांडली असता शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून द्यावे असे आदेश मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
सदरचा प्रश्न सुटल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे .