राहुरी कृषी विद्यापीठातील प्रकल्पग्रस्त नोकरभरतीत दलालांचा सुळसुळाट सुरू असल्याची चर्चेला चांगलाच वेग .

राहुरी कृषी विद्यापीठातील प्रकल्पग्रस्त नोकरभरतीत दलालांचा  सुळसुळाट सुरू असल्याची चर्चेला चांगलाच वेग .

          राहुरी कृषी विद्यापीठामध्ये नोकरी मिळण्यासाठी प्रकल्पग्रस्तांनी मोठे लढे उभारून प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून घेतला आहे. प्रकल्पग्रस्तांचे अथक परिश्रम

 व माननीय कुलगुरू डॉ पी जी पाटील यांच्या प्रयत्नाने प्रकल्पग्रस्तांच्या भरतीस आत्ता मुहुर्त मिळाला असुन प्रकल्पग्रस्तांसाठी विद्यापीठाने नोकर भरती सुरू केली आहे विद्यापीठाच्या जाहिरातीच्या अनुषंगाने सदरची भरती ही अतिशय पारदर्शक होत आहे असे असताना काही दलाल मंडळींनी प्रकल्पग्रस्तांकडून फोन नंबर घेऊन गेलेले समजते तसेच विद्यापीठातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संपर्कात देखील हे दलाल आले असल्याची ही कुजबुज विद्यापीठ परिसरात ऐकावयास मिळते परंतु अशा कोणत्याही दलालांच्या भूलथापांना प्रकल्पग्रस्तानी बळी पडून अर्थीक तडजोडी व व्यावहार करू नये

 व दलालांना पैसे देऊन नोकरी मिळेल या भ्रमात राहू नये कारण सदरची भरती प्रक्रिया ही अतिशय पारदर्शक होतानाचे चित्र दिसत असताना दलालांचा सुळसुळाट विद्यापीठ परिसरात दिसून येतो तरी कृपया कोणीही प्रकल्पगस्त अर्जदाराने दलालांच्या मागे पळू नये फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही सदरची भरती प्रक्रिया ही कायदेशीर व पारदर्शक होण्याबाबत मा.कुलगुरू साहेबांनी सक्त ताकीद दिली आहे. त्या मुळे आपली अर्थीक फसवणूक होणार नाही याची प्रत्येकाने दक्षता घ्यावी.