अल्पवयीन मुलीस लैंगिक अत्याचार /अनैतिक कृत्य करण्याचे उद्देशाने पळून नेण्यास मदत करणाऱ्या मित्रास अटक .

अल्पवयीन मुलीस लैंगिक अत्याचार /अनैतिक कृत्य करण्याचे उद्देशाने पळून नेण्यास मदत करणाऱ्या मित्रास अटक .

राहुरी पोलीस स्टेशन गु र न 1263/23 भारतीय दंड विधान संहितेचे कलम 363 अन्वये गुन्हा दाखल असून दाखल गुण्हयाच्या तपासामध्ये सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीस आरोपी नामे विकास नामदेव बर्डे, वय 20 वर्षे, राहणार राहुरी खुर्द तालुका राहुरी

याने मुख्य आरोपीस पिडीतेसोबत लैंगिक कृत्य करून विवाह करता यावा या उद्देशाने पळवुन नेल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने , सदर गुन्ह्यात भारतीय दंड विधान संहितेचे कलम 366 अ वाढवण्यात आले असून पळवून नेण्यास प्रोत्साहन देणाऱ्या आरोपी नामे विकास नामदेव बर्डे वय 20 वर्ष यास आज दिनांक 06/02/2024 रोजी दाखल गुन्ह्याच्या तपास कामी तथा लैंगिक अत्याचारासाठी पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध घेणे कामी अटक केलेले असून पुढील तपास पोलीस हवालदार शेळके करत आहे. .

सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब अप्पर पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुबर्मे , विभागीय पोलीस अधिकारी डॉ श्री बसवराज शिवपुजे साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण , एएसआय ज्ञानदेव गरजे, पोलीस हवालदार शेळके, पोलीस हवालदार वैराळ पोलीस शिपाई ढाकणे पोलीस शिपाई बडे यांच्या पथकाने केलेली आहे.

        अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेणे तथा लैंगिक अत्याचार करणे यावर प्रतिबंध व्हावा म्हणून राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व शाळांमध्ये कायदेविषयक जनजागृती करून विद्यार्थ्यांना प्रबोधन करण्यात येत आहे.

सर्व नागरिकांना आव्हान करण्यात येते की अशाप्रकारे अल्पवयीन मुलींना विवाह करण्यासाठी /लैंगिक अत्याचार करण्यासाठी पळवून नेण्यास कुणी सहकार्य करत असल्यास त्याबाबतची माहिती असल्यास आपण पोलीस स्टेशनला माहिती कळवावी. आपले नाव गोपनीय ठेवण्यात येईल. तसेच सर्व पालकांनी आपल्या मुलांचे वर्तन संशयास्पद वाटल्यास त्यांचेवर बारकाईने लक्ष ठेवावे असे आव्हान करण्यात येत आहे.