शिवसेना युवा सेना राहुरी तालुका प्रमुख पदी वैभव तनपुरे तर शहर प्रमुख पदी गंगाराम उंडे यांची निवड, ना .एकनाथ शिंदे यांचे कार्य शिवसैनिकांनी घरोघरी पोहोचवावे - भाऊसाहेब चौधरी .

शिवसेना युवा सेना राहुरी तालुका प्रमुख पदी वैभव तनपुरे तर शहर प्रमुख पदी गंगाराम उंडे यांची निवड, ना .एकनाथ शिंदे यांचे कार्य शिवसैनिकांनी घरोघरी पोहोचवावे - भाऊसाहेब चौधरी .

*ना.एकनाथ शिंदे यांचे कार्य शिवसैनिकांनी घरोघरी पोहचवावे - भाऊसाहेब चौधरी*

 

*शिवसेना युवा सेना राहुरी तालुका प्रमुख पदी वैभव तनपुरे तर शहर प्रमुख पदी गंगाराम उंडे यांची निवड* .

 

          अहमदनगर येथे शिवसेना पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली.या बैठकीस शिवसेना नगर जिल्ह्याचे लोकसभा निरीक्षक अभिजित कदम,जिल्हा संपर्क प्रमुख सचिन जाधव,जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले,अनिल शिंदे,युवा सेना नगर दक्षिण जिल्हा प्रमुख अभिषेक भोसले,महिला आ.जिल्हा प्रमुख डॉ.शबनम इनामदार उपस्थित होते.या प्रसंगी शिवसेना युवा सेना राहुरी तालुका प्रमुख पदी वैभव तनपुरे तर शहर प्रमुख पदी गंगाराम उंडे यांच्या निवडीचे पत्र शिवसेना पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या हस्ते देण्यात आले.

 

         या प्रसंगी भाऊसाहेब चौधरी यांनी मार्गदर्शन करतांना म्हंटले की शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अनेक जनकल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत.सर्वसामान्य जनतेचा संवेदनशील पणे विचारकरत मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून हजारो रुग्णांना मदत करण्यात आलेली आहे. नव नियुक्त पदाधिकाऱ्यांनी ना.एकनाथ शिंदे यांच्या नेत्रुवाखली गाव तिथे शाखा हा उपक्रम राबवून शिवसेना पक्षाची ताकद वाढवावी व ना.एकनाथ शिंदे यांचे कार्य घरोघरी पोहचवावे असे भाऊसाहेब चौधरी म्हणाले.

 

         या प्रसंगी नगर लोकसभा निरीक्षक अभिजित कदम म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यांमधे सर्व निवडणुका लढविल्या जाणार आहेत.सर्व पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे अशा सुचनाही केल्या आहेत .

     

             या प्रसंगी शिवसेना राहुरी तालुका प्रमुख देवेंद्र लांबे,कर्जत प्रमुख बापुसाहेब नेटके,कर्जत युवा सेना प्रमुख सोमनाथ शिंदे, ता.संपर्क प्रमुख अशोक तनपुरे, ता.संघटक महेंद्र उगले,अंकुश चितळे,विलास तनपुरे,अशोक शेटे,भास्कर सांगळे,अमोल थोरात महेंद्र शेळके आदी शिवसैनिक उपस्थित होते .