राहुरी तालुक्यातील कृषी विभाग घेतोय शेतकऱ्यांची काळजी,पिंप्री अवघड येथे शेतकऱ्यांना दिले खरीप हंगामाचे प्रशिक्षण .

राहुरी तालुक्यातील कृषी विभाग घेतोय शेतकऱ्यांची काळजी,पिंप्री अवघड येथे शेतकऱ्यांना दिले खरीप हंगामाचे प्रशिक्षण .

*पिंपरी अवघड येथे खरीप हंगाम प्रशिक्षण संपन्न -* 

            महाराष्ट्र शासन कृषि विभागाचे वतीने ,तालुका कृषि अधिकारी बापूसाहेब शिंदे व मंडळ कृषि अधिकारी अशोक गिरगुणे यांचे मार्गदर्शनाखाली ,मौजे पिंपरी अवघड येथील दरक वस्तीवर बुधवार दिनांक 29 मे रोजी खरीप हंगाम प्रशिक्षण संपन्न झाले.

          या प्रशिक्षणात कृषी सहायक- शरद लांबे यांनी खरीप हंगामातील प्रमुख पिक- कापूस याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले ,यामध्ये जमिनीची निवड ,बीज प्रक्रिया, लागवड अंतर , जातीची निवड ,बेसल डोस, सापळा पिके लागवड इत्यादी विषयी मार्गदर्शन केले. तसेच ऊस पिकातील शेंडे कीड /कांडी किड यांचा जून महिन्यापासून प्रादुर्भाव सुरू होतो त्यासाठी पतंग ट्रॅप करण्यासाठी कामगंध सापळे ,वॉटर ट्रॅप , ट्रायको कार्ड बसविणे याचीही माहिती देण्यात आली. महाडीबीटी वरील कृषी विषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त अर्ज करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले.उपस्थित शेतकऱ्यांना कापूस बियाणे रासायनिक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखविले.

 

             याप्रसंगी पिंपरी अवघड गावातील उपसरपंच बापू तमनर ,माजी सरपंच श्रीकांत बाचकर , मुंजेश्वर पाणी वापर संस्थेचे चेअरमन दिपक लांबे , निलेश लांबे, विजय लांबे ,बाळासाहेब पवार ,रामदास होडगर, प्रकाश लांबे ,चंद्रशेखर लांबे ,साईनाथ दौंड , डॉ.संदीप बाचकर, किशोर लांबे , कृणाल बाचकर ,वसंत लांबे ,राजेंद्र पवार ,बाबासाहेब दौंड ,सचिन लांबे ,प्रशांत वाघ ,जगन्नाथ दौंड, महेश गटकळ ,गणेश दौंड ,अविनाश लांबे ,नानासाहेब लांबे, विलास दौंड , आदी शेतकरी उपस्थित होते.