सावित्रीबाई फुले विद्यालयाची उज्ज्वल यशाची परंपरा कायम, कु . आर्वी कडूस तालुक्यात प्रथम .
सावित्रीबाई फुले विद्यालयाची उज्ज्वल यशाचा परंपरा कायम, कु. आर्वी कडूस तालुक्यात प्रथम .
राहुरी तालुक्यातील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावीच्या निकालाची उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.विद्यालयातील कुमारी आर्वी आबा कडूस हिने 98.80% मिळवून विद्यालयात व राहुरी तालुक्यात प्रथम आली.तर पार्थ संदिप कराळे 96.40% मिळवून विद्यालयात दुसरा तर कु अपूर्वा विकास आवारी 96.20% मिळवून व तिसरी आली आहे . देविका अनिरुद्ध कुलकर्णी 96% गुण मिळवून चौथी तर तेजस सुनील काळे 95.80% गुण मिळवून पाचवा आला आहे .विद्यालयातील 90% पेक्षा जास्त गुण मिळवणारे 21 विद्यार्थी व 75 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवणारे 81 विद्यार्थी तर प्रथम श्रेणीत 95 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.272 पैकी 265 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन विद्यालयाचा निकाल 97.42 टक्के लागला.विद्यालयाचा यशाचा आलेख सतत वाढत आहे.
या यशाबाबत सावित्रीबाई फुले शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तथा कुलगुरू महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी चे डॉ. पी जी पाटील , सभापती डॉ. प्रमोद रसाळ , सचिव डॉ.महानंद माने खजिनदार श्री महेश घाडगे ,तसेच विद्यालयाचे प्राचार्य अरुण तुपविहीरे , उपप्राचार्य बाळासाहेब डोंगरे, पर्यवेक्षक मनोज बावा यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी ,पालक व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.