महागडे मोबाईल चोरी करणारे आरोपी अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या विळख्यात,खालापूर, जि. रायगड येथून 1,50,000/-रु. किंमतीच्या मुद्देमालासह घेतले ताब्यात .

महागडे मोबाईल  चोरी करणारे आरोपी अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या विळख्यात,खालापूर, जि. रायगड येथून 1,50,000/-रु. किंमतीच्या मुद्देमालासह घेतले ताब्यात .

 

महागडे मोबाईल चोरी करणारा आरोपी खालापुर, जि. रायगड येथुन १,५०,०००/- रुपये किंमतीचे मुद्देमालासह जेरबंद .स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगरची कारवाई.

 

 

             दिनांक २५/०१/२०२४ रोजी तक्रारदार नामे शुभम कुंडलिक वाफारे वय २२ वर्षे, रा. कर्जुले हर्या, ता. पारनेर, जि. अहमदनगर हे ट्रान्सपोर्टची गाडी घेवुन मुंबई येथे जात असतांना त्यांचा कंटेनर केडगांव बायपास, अहमदनगर या ठिकाणी नादुरुस्त झाल्याने शोरुम मध्ये गेले असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी व त्यांचे मित्राचे ०२ अॅपल कंपनीचे फोन, व ०१ विवो कंपनीचा फोन असे चोरुन नेले होते. सदर चोरीचे घटनेबाबत कोतवाली पोलीस स्टेशन गु.र.नं. ११७ / २०२४ भादवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

 

            पो .नि . दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोहेकॉ / संदीप पवार, पोना/रविंद्र कर्डिले, भिमराज खर्से, पोकॉ/अमृत आढाव, प्रशांत राठोड, चापोहेकॉ /संभाजी कोतकर यांचे पथक तयार करुन पथकास सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेवुन मुद्देमाल हस्तगत करणेबाबत सुचना देवुन पथकास रवाना केले.

 

             वरील पोलीस पथक गुन्ह्यातील आरोपीची माहिती काढत असतांना तांत्रिक विश्लेषणाचे आधारे सदर गुन्ह्यातील मोबाईल हे खालापुर, जि. रायगड येथील आरोपी ज्ञानेश्वर जाधव याने चोरी केले असल्याची माहिती प्राप्त झाली. पथकाने दिनांक ०४/०२/२०२४ रोजी खालापुर, जि. रायगड येथे जावुन आरोपीचा गुप्त बातमीदाराचे आधारे शोध घेता आरोपी नामे ज्ञानेश्वर तुकाराम जाधव वय ४३ वर्षे, रा. विणेगांव, दांडवाडी, ता. खालापुर, जि. रायगड हा मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याचेकडे गुन्हयाबाबत सखोल व बारकाईने विचारपुस करता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.

 

         ताब्यात घेण्यात आलेला आरोपी नामे ज्ञानेश्वर तुकाराम जाधव वय ४३ वर्षे, रा. विणेगांव, दांडवाडी, ता. खालापुर, जि. रायगड याचे कब्जातुन ९,५०,०००/- रुपये किमतीचे त्यामध्ये ०२ आयफोन व ०१ विवो कंपनीचा मोबाईल काढुन दिले असुन सदर आरोपीस अहमदनगर येथे आणुन त्यास पुढील तपासकामी कोतवाली पोलीस स्टेशनला हजर केले आहे. पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन करीत आहे.

 

          सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहमदनगर, प्रशांत खैरे , अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, हरिष खेडकर उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.