ख्रिस्ती विकास परिषदेच्या माध्यमातून तालुक्यात संघटन अधिक मजबूत करणार.
ख्रिस्ती विकास परिषदेच्या माध्यमातून तालुक्यात संघटन अधिक मजबूत करणार.
ख्रिस्ती विकास परिषदेच्या माध्यमातून तालुक्यात संघटन अधिक मजबूत करणार.
संगमनेर-- महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात सर्व पंथीयांना घेऊन समाजाचे प्रलंबित प्रश्न सोडवणुकीच्या दृष्टीने अतिशय चांगला प्रयत्न होत असून, संगमनेर तालुक्यात ही ख्रिस्ती समाजाची संघटन बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे उपस्थित पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. ख्रिस्ती विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. अनिल भोसले यांच्या अध्यक्षतेखाली येथील शासकीय विश्रामगृहांमध्ये नुकतीच बैठक पार पडली.
जात पडताळणी, ओबीसी दाखल्या संदर्भातील येणाऱ्या अडचणी, शासकीय योजनांचा अभाव, ख्रिस्ती समाजासाठी महामंडळाची मागणी, जात व धर्मातील होत असलेली तफावत, वाढती बेरोजगारी तसेच भारत सरकारच्या केंद्रीय अल्पसंख्यांक कार्य व्यवहार मंत्रालयाने एन. एस. पी. नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर लेखी पत्राद्वारे १ ली ते ८ वी च्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची मॅट्रिक पूर्व १००० रुपये शिष्यवृत्ती बंद केली जात असल्याने केंद्र सरकारचा हा निर्णय अन्याकारक असून अल्पसंख्याक कार्यव्यवहार मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करून शिष्यवृत्ती बंद न करता सुरू ठेवावी यासंदर्भात सदर विभागाशी पत्रव्यवहार व पाठपुरावा करण्यात येणार आहे. याबरोबरच शैक्षणिक व व्यावसायिक दृष्ट्या आपल्या मुला-मुलींना संधी प्राप्त व्हावी त्या दृष्टीने ख्रिस्ती विकास परिषदेच्या माध्यमातून प्रयत्नशील राहणार असल्याचे श्री. अनिल भोसले यांनी सांगितले. वरील महत्त्वाच्या विषयासंदर्भात श्री. लाजारस केदारी, बाळासाहेब भोसले, सुहास गायकवाड, अनुप कदम, प्रकाश दादा भोसले, संजय कदम, सुधीर ब्रम्हे सर, प्रभाकर चांदेकर, रमेश ओहोळ, फ्रान्सिस रोहम, संदीप यादव आदींनी वरील विषयासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा घडवून आणली तर श्री. लाजारस केदारी यांनी देवाकडे बैठकीतील उद्देश व संघटन मजबूत होणेसाठी प्रार्थना केली.
I am a retired as Craft Instructor from Govt. I. T. I. Shrirampur, state government Employed. Now Reporter of BPS Live news Shrirampur, Ahmednagar, Maharashtra since Dec. 2021.