वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कारीत श्री. संत नागेबाबा मल्टीस्टेट देडगाव च्या शाखेत नागेबाबा विचारधन दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा संपन्न
बालाजी देडगाव (प्रतिनिधी युनूस पठाण) सोमवार दिनांक 5 रोजी
नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कारीत श्री .संत नागेबाबा मल्टीस्टेट शाखेत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कडुभाऊ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली नागेबाबा विचारधन दिनदर्शिके चा प्रकाशन सोहळा ह भ प सुखदेव महाराज हस्ते यांच्या हस्ते
पार पडला.
नगर जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यात अग्रेसर असलेल्या नागेबाबा को ऑफ अर्बन क्रेडिट मल्टीस्टेट सोसायटी या पतसंस्थेने सन 2021- 22 या आर्थिक वर्षांमध्ये 57 शाखाद्वारे 6 लाखाहून अधिक ग्राहकांना वर्षाचे 365 दिवस दररोज बारा तास सेवा देऊन नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. या कामकाजाची दखल वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया या ऑर्गनायझेशन ने घेतली असून, 6 डिसेंबर रोजी समाधान महाराज शर्मा व भागवताचार्य केशव महाराज उखळीकर यांच्या अध्यक्षतेखाली वर्ल्ड रेकॉर्ड चे अध्यक्ष पवन कुमार सोळंकी यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
नागेबाबा मल्टीस्टेट चे संस्थापक कडू भाऊकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली 9 सप्टेंबर 2009 रोजी स्थापन झालेल्या पतसंस्थेने अल्पावधीत देशभरात 57 शाखा स्थापन करून शेतकरी ,व्यावसायिक सर्वसामान्य ,नागरिक व महिला असे सहा लाखापेक्षा अधिक ग्राहक जोडले आहेत .मल्टीस्टेटच्या सर्व शाखांमध्ये वर्षभरातील एकही सुट्टी न घेता 365 दिवस 9 ते सायंकाळी 9 या वेळेत कामकाजाचे नियोजन चालू असते .त्याचा फायदा संस्थेच्या ग्राहकांना, व्यवसायिक वृद्धीसाठी व आर्थिक चलनासाठी सुरक्षिततेसाठी झाला अशाप्रकारे संस्थेने दररोज 12 तास काम करून एका वर्षात 4380 तास ग्राहक सेवा देणारी बँकिंग क्षेत्रातील एकमेव संस्था ठरल्याने तसेच मागील 13 वर्षात 57 हजार तास ग्राहक सेवा देऊन नागेबाबा मल्टीस्टेट ने विश्वविक्रम रचला आहे.
देडगाव शाखेच्या नागेबाबा विचारधन दिनदर्शिकेचे प्रकाशन सोहळ्यानिमित्त देडगाव चे विद्यमान सरपंच चंद्रकांत पाटील मुंगसे, ज्येष्ठ पत्रकार बन्सी भाऊ एडके, प्रगतशील बागतदार शेतकरी चंद्रभान कदम ,बालाजी पाणी वाटप संस्थेचे चेअरमन संतोष तांबे ,माजी सरपंच दत्ता पाटील मुंगसे ,माजी चेअरमन योसेफ हिवाळे , शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोपान मुंगसे ,काळूराम गोयकर ,गोपीनाथ ससाने, प्रेमचंद हिवाळे टेलर, शांतिकांत नांगरे, एकनाथ बनसोडे ,हरिभाऊ मुंगसे, गंगाराम तांबे ,विजयकुमार वांढेकर ,उत्तम तांबे, जालिंदर लाडके, अरूण वांढेकर , किशोर पुंड , शिवाजी मुंगसे, नागेबाबा शाखेचे शाखा अधिकारी पांडुरंग एडके साहेब, अमोल आडवणे, सुलभाताई नांगरे संस्थेचे सभासद व खातेदार आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.