"आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली " आदेशान्वये कुलगुरूंनी केलेली कार्यवाही गुलदस्त्यात!
विद्यापीठ अभियंता कार्यालय भ्रष्टाचार बाहेर येऊ नये म्हणून माहिती अर्जाना केराची टोपली दाखविण्यात पारंगत असल्याने माहिती बाहेर जाऊ दयायचीच नाही आसा पक्का निश्चय असल्याने माहिती आयुक्तांच्या आदेशाला हि विद्यापीठ अभियंता कार्यालयाने केराची टोपली दाखवली आहे .
दिनांक १२/९/ २०२२ रोजी माहिती आयुक्त समीर सहाय यांच्यासमोर प्रलंबित असणाऱ्या त्रिभुवन यांच्या दोन अपीलांची सुनावणी झाली अपिलांवर आदेश देताना विद्यमान माहिती अधिकारी तथा सहाय्यक अभियंता यांनी पंधरा दिवसात मुद्देनिहाय माहिती रजिस्टर पोस्टाने पाठवून दया असे फर्माविले होते सहाय्यक अभियंता यांच्या स्तरावरून कोणती माहिती उपलब्ध झाली नाही परंतु विद्यापीठ अभियंता यांनी लगबगीने आदेशाला अनुसरून ३२८ पाने माहिती पोस्टाने पाठवले आहे पोस्टाने पाठवलेली माहिती धादांत खोटी चुकीची फसवणूक करून दिशाभूल करणारी आहे असे दिसून येते विद्यापीठ अभियंता त्यांनी पाठवलेली माहिती, मूळ अर्जाशी ताळमेळ खात नसून अर्जाच्या मुद्द्याशी सुसंगत नाही असे हि दिसून येते विद्यापीठात वरिष्ठांचा आशीर्वाद असल्याने आपल्याला काही होणार नाही या भ्रमात विद्यापीठ अभियंता कार्यालय काम करीत आहे विद्यापीठ अभियंता कार्यालयाला आयुक्तांच्या आदेशाचा व कायदयाचा ही धाक राहिला नाही.
आयुक्त समिर साहाय यांनी कुलगुरू प्रशांत कुमार पाटील यांना कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते परंतु कुलगुरु यांनी केलेली कार्यवाही आज रोजी गुलदस्त्यात आहे.
यापूर्वी ही विद्यापीठ अभियंता कार्यालयाने कायद्याचा व आयुक्तांच्या आदेशाचा अवमान करत आदेशाला केराची टोपली दाखवली होती आयुक्तांचे आदेश असतानाही अतिशय विस्तृत स्वरूपाच्या माहितीतील ५० पाने विद्यापीठ अभियंता यांनी कार्यालयाच्या बाहेर जाऊ दिले नाही सलग दुसर्यादा आयुक्त यांच्या आदेश घुडकावुन माहिती बाहेर येणार नाही याची खास दक्षता घेण्यात आली असल्याचे दिसुन येते.
याबाबत अधिकार्यानां विचारणा केली असता ते सायलेंट मोड वर येतात तर आयुक्तां समोर या प्रकरणी फेर सुणावणी साठी अर्ज करून तक्रार दाखल करणार असल्याचे तृशांत त्रिभुवन यांनी सांगीतले.