सोनई पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलिस हेड कॉन्स्टेबल गायकवाड यांचा कर्तव्यावर असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू.

सोनई पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलिस हेड कॉन्स्टेबल गायकवाड यांचा कर्तव्यावर असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू.

प्रतिनिधी खेडले परमानंद नेवासा

सोनई पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस हेडकॉन्स्टेबल अनंथा बंडू गायकवाड यांचे अपघाती निधन.

सोनई पोलीस स्टेशन येथे आपल्या कर्तव्यावर असताना वॉरंट बजावणी कामी कर्मचारी गायकवाड क्य (५४)हे वांजोळे या ठिकाणी जात असताना नगर -औरंगाबाद महामार्गावर पांढरी पुल येथे त्यांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला.

       आज दुपारी बारा वाजता त्यांच्या मूळ गावी पारनेर तालुक्यातील धोत्रे या ठिकाणी शासकीय इंतेमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

       आपल्या सहकाऱ्यांशी त्याचप्रमाणे परिसरातील सर्वांच्या अडचणी समजून घेणारे गायकवाड दादा यांच्या अपघाती निधनाने सोनई परिसरात शोककळा पसरली आहे.

       सोनई पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी,पोलीस निरीक्षक राजेंद्र थोरात व सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने व पत्रकार बांधवांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.