कृषी कन्यां कडून देहरे गावात मेरी माटी मेरा देश हा कार्यक्रम साजरा .

कृषी कन्यां कडून देहरे गावात मेरी माटी मेरा देश हा कार्यक्रम साजरा .

*कृषी कन्यांकडून देहरे गावात "मेरी माटी मेरा देश" हा कार्यक्रम साजरा*

१५ ऑगस्ट २०२३ ... स्वातंत्र्य दिना निमित्त देहरे ग्रामपंचायत व जिल्हा परीषद प्राथमिक शाळा देहरे, येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त रुक्षरोपण सोहळा पार पाडण्यात आला.

 डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फॉउडेंशन कॉलेज ऑफ ग्रीकलचर कॉलेजच्या कृषीकन्या व सरपंच आणि जिल्हापरीषद शाळेचे मुख्याध्यापक श्री. दहातोंडे सर व इतर शिक्षक वृंद यांच्या सहाय्याने कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.

 

या वेळी कृषीकन्यांनी प्रमुख पाहुणे , माजी सैनिक - मेजर संभाजी खजिंदार, मेजर संतोष काळे, मेजर आप्पा काळे, मेजर बाबासाहेब काळे, मेजर दादा काळे, मेजर संदीप कारंडे, मेजर सुभाष गायकवाड , मेजर अरुण जेजुरकर, मेजर बाबासाहेब बराट , मेजर संतोष कुसळकर व इतर कर्मचारी वर्ग यांचा यथोचित सत्कार करण्यात आला व महाविद्यालयाच्या अभिनव उपक्रमांची माहिती दिली. या वेळी माजी सैनिक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आला.

या वेळी देहेरे गावाचे सरपंच नंदा संतोष भगत, ग्रामसेवक साळवे नंदकुमार ग्रामपंचायत व सदस्य , विदयालयाचे मुख्याध्यापक श्री. दहातोंडे सर उपस्थित होते.या उपक्रमासाठी कृषीकन्या लांबे पुजा सूर्यभान , मोहिते शुभदा आण्णा , तांबे भैरवी भानुदास, सूर्यवंशी मैथिली दत्तात्रय , लष्करे प्रथमेशवरी संतोष यांना प्राचार्य डॉ. एम. बी . धोंडे, उपप्राचार्य प्रा. डॉ. एस. बी.राऊत, कार्यक्रम समन्वयक प्रा. किरण दांगडे , प्रा. बी.व्ही . गायकवाड , प्रा. डॉ .एच. एल शिरसाठ, प्रा. ठोंबरे मॅडम प्रोग्राम ऑफिसर यांचे मार्गदर्शन लाभले .