सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करूया ही छत्रपतींची प्रेरणादायी शिकवण ठरेल .- शिवसेना तालुका उपप्रमुख रामानंद मुंगसे.

सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करूया ही छत्रपतींची प्रेरणादायी शिकवण ठरेल .- शिवसेना तालुका उपप्रमुख रामानंद मुंगसे.

बालाजी देडगाव (प्रतिनीधी)

नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे तिथीनुसार शिवजयंती ह.भ प. सुखदेव महाराज मुंगसे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

          प्रथम शिव पुतळ्याच्या समोर आरती म्हणून अध्यक्ष व मान्यवरांच्या हस्ते शिव गर्जनात पुतळ्याचे पूजन करण्यात आले.

       यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवसेनेचे तालुका उपप्रमुख रामानंद मुंगसे यांनी आपल्या मौलिक शब्दात सर्व जाती धर्मांना समान वागणूक द्यावी व सर्वांना सोबत घेऊन छत्रपती शिवराय व सर्व जातीतील श्रेष्ठ संत, महापुरुष यांच्या जयंतीचे उत्सव सर्वांनी एकत्र येऊन साजरे करावे हीच छत्रपती शिवरायांची खरी शिकवण आहे. 

         यानंतर राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अभिजित ससाने यांनीही आपण खरे शिवरायांच्या विचाराचे वारसदार आहोत हीच खरी शिकवण सर्व तरुणांना दिली. त्यानंतर देडगावचे विद्यमान सरपंच चंद्रकांत पाटिल मुंगसे यांनी भविष्यामध्ये या गावांमध्ये शिव स्मारक बांधण्याचा निर्धार करू असे आश्वासन दिले. नंतर बळीराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मच्छिंद्र मुंगसे यांनी अतिशय मौलिक शब्दात शिवव्याख्यान मांडल्याने हे आजचे खरे शिवचरित्रकार म्हणून संबोधले गेले.

    या शिवमय वातावरणाने देडगाव नगरी अतिशय गजबजून गेली. या शिवजयंती सर्व जाती धर्माचे लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

       यावेळी उपस्थित जेष्ठ पत्रकार बन्‍सी भाऊ एडके, देडगाव विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक बाबासाहेब पाटील मुंगसे, बजरंग दलाचे अध्यक्ष सागर मुंगसे, मा.सरपंच दत्ता पाटील मुंगसे,युवा नेते निलेश कोकरे ,भाजपा युवा मोर्चाचे तालुका उपप्रमुख आकाश चेडे वंचित बहुजन चे बलभीम सकट, एकनाथ फुलारी ,मुस्लीम संघाचे अध्यक्ष खानसाहेब पठाण ,बालाजी देवस्थानचे विश्वस्त सुभाष मुंगसे ,व्यवसायिक संघटनेचे अध्यक्ष किशोर मुंगसे ,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोपान मुंगसे, जय हरी आसाराम पाटील मुंगसे , किशोर वांढेकर,उद्धव नागरे ,हरिभाऊ तागड, अशोक मुंगसे ,चांगदेव टकले, डॉ. गणेश मुंगसे, पोलिस विशाल मस्के , पोलिस बाळासाहेब भिसे , किरण मस्के बाबू मुंगसे अरुण वांढेकर ,मयूर कदम, सागर गवळी , श्रावण औटी ,गणेश तांबे, शुभम तिडके, मंगेश तिडके ,दिलीप तांदळे ,भैया क्षिरसागर भवड्या मुंगसे आदी शिव मावळे व शिवभक्त उपस्थित होते.

     या शिव सोहळ्याच्या कार्यक्रमाचे आभार कुलदीप कुलट यांनी मानत सायंकाळी ठीक सहा वाजता छत्रपती शिवरायांची जंगी मिरवणूक होणार आहे सर्व ग्रामस्थांनी या मिरवणूकीत सहभागी व्हावे असे आवाहन केले.