पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३६ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३६ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

म्हैसाळमध्ये कर्मवीर जयंती उत्साहात साजरी

म्हैसाळ : रयत शिक्षण संस्थेच्या म्हैसाळ येथील कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३६ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

     यावेळी विद्यालयाच्या स्कूल कमिटीचे सदस्य श्री. पुष्पराज शिंदे - म्हैसाळकर यांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील व त्यागमूर्ती लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. कदम सी. डी., पर्यवेक्षक श्री. लादे एस. डी. व सर्व शिक्षक उपस्थित होते.प्रतिमापूजन झाल्यानंतर सजवलेल्या ट्रॅक्टर मधून कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेची म्हैसाळ गावातून ढोल, ताशा, लेझीम, झांज व झेंडा पथकाच्या निनादात भव्य - दिव्य मिरवणूक काढण्यात आली. म्हैसाळ गावात ठिकठिकाणी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मिरवणूकीनंतर विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देण्यात आले.