खेडले परमानंद येथे नामसंकीर्तनाने पुण्यस्मरण संपन्न.

खेडले परमानंद येथे नामसंकीर्तनाने पुण्यस्मरण  संपन्न.

प्रतिनिधी :-नेवासा

खेडले परमानंद येथील दादासाहेब रोठे यांनी मातृ ऋण निभावले.

  एकीकडे समाजात अशी परिस्थिती झाली आहे की आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवण्यात येते.

 या सुशिक्षित उच्चवर्णीय समजल्या जाणाऱ्या समाजात हे चालते.

        परंतु शेतकरी कुटुंबात असणारे दादासाहेब रामदास रोठे यांनी आपल्या मातोश्री कै भिकुबाई रामदास रोठे यांचे पुण्यस्मरण अतिशय चांगल्या पद्धतीने केले. अगदी शेवटपर्यंत भिकुबाई यांची रोठे कुटुंबानी चांगल्या प्रकारे सेवा केली.

 या वेळी ह.भ.प. ईश्वर महाराज कदम ज्ञानाई वारकरी शिक्षण संस्था वांबोरी यांचा विशेष नाम संकिर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .

   या कार्यक्रमाला ग्रामस्थ , मित्रपरिवार त्याचप्रमाणे नातलग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

        यावेळी हरिभक्त परायण ईश्वर महाराज कदम यांनी जीवनातील आईवडिलांचे स्थान व त्याची महती समाजाला पटवून दिली .

आई- वडिलांसाठी पुंडलिकाने सर्वस्व पणाला लावले त्या पुंडलिकाच्या सेवेला प्रभावित होऊन समक्ष पांडुरंग परमात्मा त्यांच्या भेटीसाठी येऊन उभे राहिले तरी सेवेतून विराम न देता त्यांना विटेवर उभे राहण्यास सांगितले अशा मातृ-पितृ सेवेची महती ईश्वर महाराज कदम यांनी आपल्या नाम संकिर्तनातून सांगितली.