संकष्टी चतुर्थी निमित्त आव्हणे गणपती येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन .

संकष्टी चतुर्थी निमित्त आव्हणे गणपती येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन .

संकष्टीचतुर्थी निमित्त आव्हणे गणपती येथे विविध धार्मिक कार्यक्रम. 

 

 

आव्हाणे बु :- शेवगाव तालुक्यातील गणपती आव्हणे येथे दि.8 रोजी संकष्टी चतुर्थी निमित्ताने धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. 

                सकाळी 7 वा. पैठणवरून आणलेल्या गंगेच्या पाण्याने श्रीची आरती व महाभिषेक श्री.रावसाहेब बाबुराव चव्हाण व श्री.सतीश रंगनाथ वाणी शेवगाव यांच्या हस्ते होईल. दुपारी 12 वा. भाविकांना फराळाची व्यवस्था श्री.रावसाहेब बाबुराव चव्हाण आव्हाणे बु व श्री.सतीश रंगनाथ वाणी शेवगाव याच्या वतीने करण्यात आली आहे.सायंकाळी 6 वा. ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज बटुळे शेवगाव यांचे कीर्तन होईल. सायं. 7 वा. श्रीची आरती व महाभिषेक उद्योजक श्री.कैलास पा.काकडे व श्री. विकास पा.काकडे याच्या हस्ते होईल. रात्री 8.30 वा.श्री. कैलास पा. काकडे व श्री. विकास पा. काकडे आव्हाणे खुर्द यांच्यावतीने महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.त्यानंतर दादोबा देव एकतारी भजनी मंडळ आव्हाणे बु यांचा जागराचा कार्यक्रम होईल, अशी माहिती स्वयंभु निद्रिस्त गणपती आव्हाणे बु ट्रस्टचे अध्यक्ष प्रा.मालोजीराव भुसारी, सरचिटणीस अर्जुनराव सरपते, माजी विश्व्स्त अंकुश कळमकर, रामदास दिवटे, कारभारी तळेकर, सुधाकर चोथे, नारायण जाधव, वसंत भालेराव, सचिव लक्षिमन मुटकुळे यांनी केले आहे.