निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ ( महाराष्ट्र ) या संस्थेच्या राज्य कार्यकारणी सदस्यपदी मा. श्री . बाळासाहेब डोंगरे यांची नियुक्ती .

निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ ( महाराष्ट्र ) या संस्थेच्या राज्य कार्यकारणी सदस्यपदी मा. श्री . बाळासाहेब डोंगरे यांची नियुक्ती .

             

               सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे पर्यवेक्षक माननीय श्री . बाळासाहेब सोपान डोंगरे यांची निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ (महाराष्ट्र )या संस्थेच्या राज्य कार्यकारणी सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे .त्यांच्या या नियुक्तीने सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची मान अभिमानाने उंचावली आहे .निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक वृक्षमित्र स्व.आबासाहेब मोरे हे होते . भारत सरकारचे वृक्षमित्र पुरस्कार व राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार तसेच महाराष्ट्र राज्य वनश्री पुरस्काराने या संस्थेस सम्मानित करण्यात आले आहे .या संस्थेचे अध्यक्ष श्री . प्रमोद मोरे यांनी श्री .बाळासाहेब डोंगरे यांच्या उत्तम कार्याची दखल घेऊन या संस्थेच्या राज्य कार्यकारणी सदस्य पदी नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली आहे .

 

 

           सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये श्री . बाळासाहेब डोंगरे हे हरित सेनेचे सचिव या पदावर काम करत आहे . सन 2003 पासून विद्यालयात विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सहकार्याने वृक्षारोपण आणि संवर्धन तसेच पर्यावरण विषयक विविध उपक्रम राबविण्याचे काम त्यांच्या मार्फत करण्यात आले आहे.

 

        वृक्षांना रक्षा बंधन,कचरा होळी, नैसर्गिक रंग निर्मिती कार्यशाळा आयोजन,मातीचे गणपती बनवणे स्पर्धा, निबंध स्पर्धा,ओझोन दिनाच्या निमित्ताने पर्यावरण जनजागृती रांगोळी स्पर्धा यासारखे स्तुत्य उपक्रम विद्यालयामध्ये राबविले जात आहेत.अनेक जखमी पक्षांना प्राथमिक औषधोपचार करून नैसर्गिक वातावरणात सोडण्याचे काम केले जात आहे .मुलांना पक्षी-निसर्गाविषयी गोडी निर्माण व्हावी यासाठी सलग अकरा वर्षांपासून पन्नास ते साठ विद्यार्थ्यांच्या सहकार्याने पक्षी गणना करण्यात येते.

 

       हे सर्व उपक्रम यशस्वीरित्या राबविन्यासाठी कुलगुरू डॉ.पी.जी.पाटील ,सभापती डॉ . प्रमोद रसाळ, संस्थेचे सचिव डॉ .महानंद माने,खजिनदार श्री . महेश घाडगे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आशा धनवटे, उपमुख्याध्यापक अरूण तुपविहिरे,प्रा.जितेंद्र मेटकर, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब खेत्री, शिक्षक प्रकाश शिंदे यांचेही विशेष सहकार्य लाभले असल्याचे श्री . बाळासाहेब डोंगरे यांनी सांगितले आहे .