शिर्डीतील हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालवणाऱ्या सहा हॉटेलवर एकाच वेळी छापे 15 पीडित मुलींची सुटका, 11 आरोपी अटक Dysp संदीप मिटके यांच्या पथकाची कारवाई*

शिर्डीतील हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालवणाऱ्या सहा हॉटेलवर एकाच वेळी छापे  15 पीडित मुलींची सुटका, 11 आरोपी अटक Dysp संदीप मिटके यांच्या पथकाची कारवाई*

 

( प्रतिनिधी)आज दि. 05/05/2023 रोजी Dy.s.p. संदीप मिटके यांना शिर्डी शहर परिसरात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालवून वेश्याव्यवसाय करून घेतल्या जात आहे बाबत खात्रीशिर बातमी मिळाली. त्याप्रमाणे शिर्डी परिसरात सहा वेगवेगळ्या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवुन पंचासमक्ष छापा टाकुन 15 पिडीत महिलांची सुटका करण्यात आली आहे. 11 आरोपींना ताब्यात घेण्यात आले. आरोपी विरुद्ध शिर्डी पोलीस स्टेशन येथे प्रचलित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे . 

 एकाच वेळी हॉटेल एक्झिक्युटिव्ह इन, हॉटेल साई कीर्ती पॅलेस, हॉटेल एस पी,हॉटेल साई शितल, हॉटेल गणेश पॅलेस, हॉटेल साई महाराजा अशा सहा ठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीने छापे टाकण्यात आले. या कारवाईमुळे शिर्डी शहरातील अवैध धंदे करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे. शिर्डी सारख्या पवित्र तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी चालत असलेल्या अनैतिक व्यवसायावर केलेल्या कठोर कारवाईमुळे साई भक्तांनी आणि शिर्डीकरांनी DySP संदीप मिटके यांचे कौतुक केले.

*सदरची कारवाई मा. श्री. बी.जी. शेखर पाटील IG, मा.श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक, मा.स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली Dysp संदीप मिटके , PI विलास पुजारी, Pi डोहिफोडे, PI डांगे, Pi चौधरी, pi पाटील, pi इंगळे, Api मानिक चौधरीं API थोरात, psi बोरसे व इतर पोलीस अधिकारी व अमलदार यांनी केली.*