विज्ञानाच्या गमती जमतीच्या प्रयोगातून राजच्या कल्पनाशक्तीला मिळाली चालना, विज्ञान शिक्षक श्री .अरुण तुपविहिरे यांच्या अफलातून प्रयोगाने स्नेहालय दणाणले .
*विज्ञानाच्या गमतीजमतीच्या प्रयोगातून प्रेम राजच्या कल्पनाशक्ती ला मिळाली चालना*
स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नुकताच विज्ञान प्रयोग शाळेचे उद्घाटन संपन्न झाले. उद्घाटनाच्या औपचारिक कार्यक्रमानंतर सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय महात्माफुले कृषी विद्यापीठ राहुरीचे विज्ञान शिक्षक व डॉ.सी.व्ही. रमण बालवैज्ञानिक परीक्षेचे संचालक श्री अरुण तुपविहिरे यांनी पाचवी ते दहावीतील मुलांसमोर विज्ञानाच्या गमती जमती चे प्रयोग सादर केले. त्यामध्ये पेन्सिल अदृश्य करणे,अमृत कलश,जादूची वही, प्रेक्षकांनी स्वतः कागदावर लिहुन तो कागद लिफाफ्यात बंद केलेला असताना काय लिहिले हे ओळखणे.,फुग्यातून सुई आरपार काढणे , जादूच्या बॅग मधील रुमाल अदृश्य करणे,पिठाच्या चाळणी वर ठेवलेला पाण्याचा ग्लास मधील पाणी खाली का पडत नाही.असे अनेक प्रयोग दाखवित असताना इयत्ता सहावीतील प्रेम राज मालाकार या विद्यार्थ्याकडून मिळणारा प्रतिसाद अद्भुत असा होता. त्याची कल्पनाशक्ती, निरीक्षण शक्ती ,तुपविहिरे सरांसाठी आश्चर्य जनक होती, कारण प्रेमराज या चमत्कारामागील कार्यकारण भाव सरांना सांगण्यापूर्वी ओळखत असे. फुगवलेल्या फुग्याला एक मोठी सुई चा अचूक छेद त्याने अल्पावधीत दिला. हे कसे शक्य झाले? याचा कार्यकारण भाव पण त्याने शास्त्रीय नियमाचा वापर करूनच दिला. त्याची कल्पनाशक्ती, निरीक्षण शक्ती व कार्यकारण भाव समजण्याची बुद्धिमत्ता पाहून सरांना जाणवले की आपला हा विद्यार्थी भविष्यात नक्कीच संशोधन कार्य करेल. त्यासाठी त्याच्या पालकाच्या मदतीने आपण त्याच्यात असणाऱ्या संशोधन वृत्ती साठी वातावरण निर्मिती व सुविधा देऊ, की जेणेकरून तो शाळेचे नाव लौकिक करेल.
या सायन्स लॅब उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस ,नगर तालुका गटशिक्षणाधिकारी रामनाथ कराड , संस्थेचे सचिव राजीव गुजर ,अध्यक्ष संजय गुगळे , संचालक हनीफ शेख ,प्राचार्या क्षितिजा हडप, वर्गशिक्षिका यास्मीन सय्यद उपस्थित होते.