श्रीराम विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून दिला जलसंवर्धनाचा संदेश.

श्रीराम विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून दिला जलसंवर्धनाचा संदेश.

श्रीराम विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून दिला जलसंवर्धनाचा संदेश

आव्हाणे बु :-(प्रतिनिधी भारत भालेराव)आज दि 1रोजी ढोरजळगाव येथील आठवडे बाजारात श्रीराम माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय ढोरजळगाव येथील विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून जलसंर्वधन आणि पाण्याची बचत यावर आधारित बचत पाण्याची समृद्धी जीवनाची हे पथनाट्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

कर्मयोगी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूह शेवगाव संस्थेचे संस्थापक कर्मयोगी जगन्नाथ उर्फ आबासाहेब कान्होजी काकडे यांच्या 104 व्या जयंती सोहळ्याचे औचित्त साधून यावर्षी 25 जून ते 24 जुलै या एक महिन्याच्या कालावधीत जयंती निमित्त विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम साजरे करण्यात येत आहेत.त्याचाच एक भाग म्हणून आज आठवडे बाजारात विद्यालयातील विद्यार्थीनींनी बचत पाण्याची,समृद्धी जीवनाची,हे पथनाट्य गावातील मुख्य चौकाच्या ठिकाणी सादर केले.ज्यामध्ये पाण्याची उपलब्ध स्त्रोत आणि आज जर पाणी बचत केली नाही तर आपल्यावर ओढवणारं संकट याविषयी जनजागृती केली.

  या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य संजय चेमटे,पर्यवेक्षक सुनील जायभाये,ढोरजळगाव चे सरपंच डॉ सुधाकर लांडे,माजी प्राचार्य विक्रमराव उकिर्डे,ग्रा पं सदस्य देविदास गिऱ्हे,रोहन साबळे,मा चेअरमन भिवसेनजी केदार,अनिल नागरगोजे यांचेसह परिसरातील मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जेष्ठ शिक्षक सुधाकर आल्हाट,सुरेश तेलोरे,भाऊसाहेब टाकळकर,ईश्वर वाबळे,राहुल दहातोंडे,विनोद फलके, श्रीम पूनम वाबळे,श्रीम दिपाली पाटेकर यांनी विशेष प्रयत्न केले.