बनावट कागदपत्रे फसवणूक करणाऱ्या टोळीस साथ दिली म्हणून डिग्रसच्या सरपंचास अटक.
बनावट दस्तऐवज प्रकरणात डिग्रस ग्रामपंचायत सरपंच पोपट बर्डे यांचेवर व इतर मुख्य आरोपींवर दि.०१.०७.२०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता . त्यातील सहकारी आरोपी सरपंच पोपट बर्डे यास पोलिसांनी अटक केली आहे . सुमारे ४ महिने सतत पाठपूरावा करत असतांन अजूनही या प्रकरणातील मुख्य आरोपी रंभाजी गावडे व प्रमोद गावडे यांच्यावर कारवाई झालेली नाही . नाना पवार (वय वर्ष ६५ )यांच्या वडिलोपार्जित डिग्रस गाव हद्दीतील प्लॉट सिटी सर्वे नं १६१ हा तुकाराम मुक्ताजी पवार यांच्या नावे नोंद होती .सदर नोंदीवर नाना तुकाराम पवार व इतर वारस लावण्याचे त्यांचेकडून राहुन गेले होते.
याचा गैरफायदा घेत रंभाजी बाबूराव गावडे व प्रमोद रंभाजी गावडे या बापलेकाने नेहमीच्या सवयीप्रमाणे कट कारस्थान सुरू केले .अशातच त्यांना २७ लाख रु SBI बँक घोटाळा प्रकरणातील आरोपी योगेश दिलीप पवार हा हाती आला . या तीघांनी मिळून इतर काही जणांना चिरीमिरीचे अमिष दाखवून या बनावट दस्तऐवज प्रकरणात सामिल करून घेतले व सदर प्लॉट नावावर करून घेतला .तसेच रंभाजी गावडे याचे इतर अनेक प्रकरणात बनावट कारनामे केलेले कागदपत्रे हाती लागले आहेत . त्यांच्या बरोबर आनखी बनावट कागदपत्रे करणाऱ्या साथीदारांची नावे पुढे येणार आहेत .तेही पोलिसांपुढे सादर करणार असलेचे नाना पवार यांनी सांगीतले आहे .तरी वरिल फसवणूक प्रकरणात मला लवकरात लवकर न्याय मिळावा व जे मुख्य आरोपी मोकाट फिरत आहेत त्यांना त्वरित अटक करून कायदेशीर कार्यवाही करावी असे यातील मुळ फीर्यादी नाना तुकाराम पवार यांनी सांगितले आहे.