शिव भारतकार कवी परमानंद महाराजांच्या पादुकांचे प्रयागराज येथे शिष्यांसह शाही स्नान
शिव भारतकार कवी परमानंद महाराजांच्या पादुकांचे प्रयागराज येथे शिष्यांसह शाही स्नान .
संतांची पावन भूमी म्हणून ओळखला जाणारा नेवासा या पुण्यभूमीतील असणारे खेडले परमानंद येथील शिवछत्रपतींच्या जीवनावर आधारित असलेल्या शिवभारत ग्रंथाचे लेखक कवी परमानंद यांच्या पादुकाचे व शिष्य सोटे महाराज यांचे प्रयागराज या ठिकाणी मौनी अमावस्ये निमित्त शाहिस्नान झाले. ग्रामस्थांच्या सहभागाने प्रातिनिधिक स्वरूपात समाजसेवक व परमानंद बाबा भक्त परिवारातील संभाजी शिंदे हे प्रयाग्रज येथे गेले होते .
प्रयागराज येथून कुंभमेळ्यातून आल्यानंतर खेडले परमानंद ग्रामस्थांच्या वतीने पादुकांचे व गंगा कलशाच्या पाण्याचे भव्य स्वागत व मिरवणूक काढण्यात आली . यामध्ये अगदी आबाल वृद्ध पासून तर सर्वांनीच मोठ्या आनंदाने व भक्ती भावाने सहभाग घेतला ..
गावातील युवकांच्या वतीने या मिरवणुकीचे नियोजन करण्यात आले होते . यामध्ये योगेश वैरागर, कृष्णा राऊत , बाळा ब्राम्हणे , राहूल भुजबळ,लक्ष्मण वैरामर यांनी विषेश योगदान दिले .महिला भगिनींनी सडा रांगोळीची आरस केली होती .मोठ्या आनंदाने सर्वांनी पादुकांचे स्वागत केले .त्यानंतर मठामध्ये गंगा पुजन झाले . यावेळी सर्वांना महाप्रसाद देण्यात आला .
या कार्यक्रमासाठी गावातील अनेक ज्येष्ठ नागरिक व भाविक उपस्थित होते यामध्ये . देवबाप्पा प्रभाकर कुलकर्णी , पुजारी दौलत मोकाशी ,मुळा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन नानासाहेब तुवर,माजी संचालक भाऊसाहेब मोकाशी,सूर्यभान आघाव , महंमद भाई इनामदार ,तंटामुक्ती उपाध्यक्ष संदीप भाऊ तुवर ,डॉक्टर हरेकृष्ण गुरसाळ ,बाळासाहेब आंबिलवादे ,वारकरी संप्रदायाचे अध्यात्मिक प्रवक्ते पोपट भाऊ आघाव , राजाबापु शिंदे , कोंडीभाऊ तुवर , दादासाहेब रोठे , दत्तात्रय कुंभकर्ण , सिताभाऊ तूवर ,चांगदेव गोसावी , संदिप बर्डे , राधु माळी,अशोक शिंदे , भैय्या शेख , पेत्रस वैरागर , साहेबराव जाधव , चंद्रकांत गोसावी,योगेश जाधव,दत्तात्रय गडाख,तुळशीदास तुवर ,सुरेश राजळे,गणपत गिरी ,आदितसह अनेक ग्रामस्थ सहपरिवार या मिरवणुकीत सहभागी झाले .