शेजारच्या घरात घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगार पती - पत्नीला राहुरी पोलिसांनी अवघ्या 12 तासात केले जेरबंद, हस्तगत केलेला मुद्देमाल दिला फिर्यादीच्या ताब्यात.

* *शेजारच्या घरात घर फोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगार पती-पत्नीला राहुरी पोलिसांनी अवघ्या बारा तासात जेरबंद करून हस्तगत केलेला सोने व चांदीचा मुद्देमाल दिला फिर्यादीच्या ताब्यात*
दिनांक 03/12/2024 रोजी राहुरी पोलीस स्टेशन गु र नं-1251/2024 बीएनएस कलम- 305(अ),331(3,6)प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता.नमूद सदर दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपींची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळाल्याने सदर गोपनीय माहितीच्या आधारे संशयित इम्रान निसार शेख वय 30 व त्याची पत्नी.आयशा कासम शेख वय 31 रा.यावल, तालुका-यावल,जिल्हा जळगाव.. हल्ली रा- मुलंनमाथा ता.राहुरी यांना ताब्यात घेऊन त्यांचेकडे तपासात कसून चौकशी केली असता सदर आरोपींनी नमूद गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांना अटक करून मा. हुजूर न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना चार दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन रिमांड कालावधीमध्ये चोरीस गेलेला 64000/-रुपये किमतीचा मुद्देमाल राहुरी व यावल जिल्हा जळगाव या ठिकाणांवरून राहुरी पोलिसांनी हस्तगत केला होता.
सदरचा मुद्देमाल मा. न्यायालयाच्या आदेशाने फिर्यादी वाशिम शेख व त्याची पत्नी हसीना वसीम शेख यांचे ताब्यात पोलीस निरीक्षक राहुरी पोलीस स्टेशन यांच्या हस्ते आज दि.08/04/2025 रोजी देण्यात आला आहे.