*नेवासा शहरातील हॉटेल कुलस्वामिनी, हॉटेल विलास व हॉटेल प्रवरा येथील वेश्या व्यवसायावर छापा* *सात पीडित महिलांची सुटका व तीन आरोपी ताब्यात* *DySP संदीप मिटके यांच्या पथकाची धडाकेबाज कारवाई*
): आज दि.5/04/2023 रोजी Dysp संदीप मिटके यांना नेवासा शहरात सेक्स रॅकेट चालवून बळजबरीने वेश्याव्यवसाय करून घेतल्या जात आहे बाबत गुप्त बातमी मिळाली. त्यावरून नेवासा शहरातील हॉटेल कुलस्वामिनी, हॉटेल विलास व हॉटेल प्रवरा या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवुन पंचासमक्ष छापा टाकुन सात पिडीत महिलांची सुटका करण्यात आली आहे.
त्यानुसार आरोपी 1) मच्छिंद्र ज्ञानदेव कुटे 2) गणेश रामचंद्र चव्हाण 3) रामदास नामदेव काळे सर्व रा.नेवासा यांच्याविरुद्ध नेवासा पोलीस स्टेशन येथे महिला आणि मुलींचे अनैतिक व्यापारस प्रतिबंध अधिनियम कलम 3,4,5,7,8 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाच वेळी तीन ठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीने छापा टाकण्यात आला या कारवाईमुळे नेवासा परिसरातील व शहरातील अवैध धंदे करणार्यांचे धाबे दणाणले आहे.
*सदरची कारवाई मा. श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक, मा.स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली Dysp संदीप मिटके , PI डोईफोडे, PI चौधरीं, PI पुजारी, Asi राजेंद्र आरोळे, PN प्रशांत ननावरे,PN बबन तमनर, पोना बाळासाहेब नागरगोजे, म पो.ना. सविता उंद्रे, पोकाॅ आसाराम बटुळे,पोकाॅ.शाम गुंजाळ मपोकाॅ शिरसाठ, मपोकाॅ सुषमा जाधव, यांनी केली.*