दारूच्या नशेत 15 जणांकडून ,राहुरी पोलीस कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला
आठ मार्च रोजी राहुरी पोलीस स्टेशन च्या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या तीन आरोपीची राहुरी पोलिसांनी काढली शहरातून धिंड
राहुरी ता प्रती -

देवेंद्र शिंदे
चारचाकी गाडीला कट लागल्याच्या कारणावरुन ट्रक चालकाला मारहाण करत असताना एका पोलीस कर्मचाऱ्याने मज्जाव केला.होता याचा राग मनात धरून सुमारे १५ आरोपींनी दारूच्या नशेत पोलिस कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला करत लोखंडी गज, लाकडी दांडा व लाथा बूक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना दि. ८ मार्च रोजी सायंकाळी डिग्रस फाटा येथे त्यानंतर रात्रीच्या दरम्यान राहुरी शहर हद्दीत घडली होती त्यानंतर काही वेळातच राहुरी पोलिसांनी तीन आरोपीना चारचाकी वाहनासह अटक केली होती. त्याचबरोबर अटक केलेल्या आरोपीना डी वाय एस पी जयदत्त भवर साहेब यांच्या समोर हजर करून पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक समाधान फडोळ साहेब यांनी फौजफाटा सोबत घेऊन तीनही आरोपीची राहुरी पोलीस स्टेशन येथून शहरात पायी धिंड काढली होती.
दि. ८ मार्च २०२६ रोजी राहुरी पोलिस ठाण्यातील पोलीस हवालदार विकास रंगनाथ वैराळ यांना आरोपींनी शिवीगाळ करून दमदाटी केली होती. त्यानंतर हवालदार विकास वैराळ हे रात्री ११.३० वाजे दरम्यान राहुरी शहरातील ग्रीन हॉटेल चौक येथे ड्युटी करत असताना तेच आरोपी तेथे आले. त्यांनी हवालदार विकास वैराळ यांना पून्हा विनाकारण शिवीगाळ केली. तसेच फायटर, लोखंडी गज, लाकडी दांडा व लाथा बूक्क्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेत हवालदार विकास वैराळ हे गंभीर जखमी झाले होते. त्यांनी दिलेल्या जबाबावरून राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी खंडु वसंत काळे, वैभव बाबासाहेब तारडे, संतोष अंकुश काळे, सर्व रा. बुरुडगाव, ता. जि. अहील्यानगर तसेच महेश निमसे व अनोळखी ११ इसम अशा एकुण १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस पथकाने आरोपी खंडु काळे, वैभव तारडे, संतोष काळे यांना ताब्यात घेऊन त्यांची राहुरी शहरातून पायी धिंड काढली . इतर पसार आरोपीचा देखील तपास सुरु आहे तसेच या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक समाधान फडोळ हे करीत आहे.








